Cylinder explode : घरात लावलेल्या दिव्याने आग लागून सिलिंडरचा स्फोट

हर्सूलच्या छत्रपतीनगरातील घटना, सुदैवाने जीवितहानी टळली
sambhajinagar gas cylinder blast news
Cylinder explode : घरात लावलेल्या दिव्याने आग लागून सिलिंडरचा स्फोटfile photo
Published on
Updated on

Cylinder explodes after fire breaks out due to lamp in house

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा तिसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत लावलेल्या दिव्याने पेट घेतल्याने घरात आगीचा भडका उडाला. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने खोलीत ठेवलेल्या दोन पैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला.

sambhajinagar gas cylinder blast news
Water Supply : टप्पे दोन दिवस लांबणीवर; सुरळीत झालेला पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

ही घटना हर्सल परिसरातील छत्रपतीनगर गल्ली क्रमांक २ येथे रविवारी (दि. २२) दुपारी १२:३० ते १:३० वाजेदरम्यान घडली. प्रसंगावधान राखत घरातील सदस्य तात्कळ बाहेर पळाल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. हसूल पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, किशोर राऊत यांचे तीन मजली घर आहे. छतावर त्यांनी एक पत्र्याची खोली बांधलेली आहे. त्या खोलीत आजी आजोबा राहतात. घरात लग्नकार्य असल्याने राऊत यांनी दोन सिलिंडर आणून त्याच खोलीत ठेवले होते.

sambhajinagar gas cylinder blast news
Scholarship Exam : पन्नास हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

दरम्यान, रविवारी आजोबाने खोलीत दिवा लावला होता. मात्र दिव्याने आग भडकून शॉर्टसर्किट झाले. आधी गादीला आग लागली. ही आग झपाट्याने पसरत गेली आणि त्यानंतर खोलीतील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हर्सल ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी तात्काळ डायल ११२ चे अंमलदार दिनेश पुसे, राकेश देशमुख यांना सूचना दिल्या. अग्निशमनला कळविले.

त्यानंतर अर्ध्या तासात अग्निशमनने आग आटोक्यात आणली. घरातील सर्व सदस्य सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आगीत घरातील फर्निचर, कपडे आणि इतर घरगुती साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news