Crime News : फार्मसीच्या विद्यार्थ्याला रॉडने बेदम मारहाण

एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल
sambhajinagar crime news
Crime News : फार्मसीच्या विद्यार्थ्याला रॉडने बेदम मारहाणFile Photo
Published on
Updated on

Crime News: Pharmacy student brutally beaten with a rod

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कॅफेमध्ये भेटलेल्या परिचयाच्या तरुणांनी फिरण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून नेले आणि पैशाची मागणी करत एका फार्मसीच्या विद्यार्थ्याला रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना ३० जूनला रात्री ८ वाजेच्या सुमारास चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील पाम हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.७) चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाविद सय्यद, राफे हुसैन (रा. रोजाबाग), राफे आणि अबू बकर अशी आरोपींची नावे आहेत.

sambhajinagar crime news
Lemon Tree Hotel Assault |'लेमन ट्री' हॉटेलमध्ये टोळक्याचा राडा; कर्मचाऱ्यांना मारहाण

फिर्यादी यामीन आरेफ नक्षबंदी (२३, रा. एव्हरेस्ट कॉलेजजवळ, जटवाडा रोड) याच्या तक्रारीनुसार, तो फार्मसीचे शिक्षण घेतो. ३० जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तो चिकलठाणा एमआयडीसी येथील 'विस्क कॅफे' मध्ये जेवणासाठी गेला होता. तिथे त्याला ओळखीचा नाविद, राफे हुसैन, राफे आणि अबू बकर हे भेटले.

त्यांनी 'चल हम बाहर घुमकर आयेंगे', असे म्हणत यामीनला कॅफेबाहेर बोलावले. त्यानंतर नाविद चालवत असलेल्या काळ्या रंगाच्या कारमध्ये बसवून ते त्याला पाम हॉटेलसमोरील फ्लेमिंगो सोसायटीजवळ घेऊन गेले.

sambhajinagar crime news
कीर्तनाला जाणाऱ्या रिक्षालचालकासह कुटुंबीयांना मारहाण

मारहाण करून रस्त्यावर फेकले

त्या ठिकाणी आरोपींनी यामीनकडे पैशाची मागणी केली. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच गाडीतून खाली ओढून रस्त्यावर पाडले आणि लाथाबुक्क्यांसह रॉडने त्याचे दोन्ही पाय, पाठीवर आणि छातीवर बेदम मारहाण केली. यामीनला विस्क कॅफे येथील त्याच्या गाडीजवळ जखमी अवस्थेत सोडून आरोपी निघून गेले. तपास हवालदार अरविंद मेने करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news