Crime News : 'रील्स' दाखवण्याच्या बहाण्याने चिमुकलीसोबत अश्लील कृत्य

नराधमाचे कृत्य कॅमेऱ्यात कैद; उस्मानपुरा पोलिसांत 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा
Crime News
Crime News : 'रील्स' दाखवण्याच्या बहाण्याने चिमुकलीसोबत अश्लील कृत्यfile photo
Published on
Updated on

Crime News: Obscene act committed against a little girl under the pretext of showing her 'Reels'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उस्मानपुरा भागात एका ११ वर्षीय चिमुकलीला मोबाईलवर 'रील्स' दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका ४० वर्षीय नराधमावर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; १७ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार, तरूणावर गुन्हा दाखल

रामदास सो नाजी आढाव (४०, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) असे या आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची हर्मूल कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी रविवारी (दि.५) दिली.

पीडित मुलीची आई नोकरीनिमित्त बाहेर गेल्या होत्या. याचा गैरफायदा घेत आरोपी रामदास याने ३ जुलै रोजी दुपारी चिमुकलीला मोबाईल देण्याच्या बहाण्याने बोलावले. तिथे तिच्याशी अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला.

Crime News
Beed News : ब्‍लॅकमेलिंगला कंटाळून १४ वर्षीय विद्यार्थिनीने जीवन संपवले

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने तिला 'तुझ्या आईला आणि भावाला मारून टाकेन', अशी धमकी देऊन सलग ४-५ दिवस हा संतापजनक प्रकार सुरू ठेवला होता. या घटनेदरम्यान एका जागरूक तरुणाने हा धक्कादायक प्रकार पाहिला. पुरावा म्हणून त्याने या कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला आणि तात्काळ पीडितेच्या आईला बोलावून याची माहिती दिली. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने रडत सर्व आपबिती सांगितली. यानंतर आईने थेट उस्मानपुरा ठाणे गाठत फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news