Beed News : ब्‍लॅकमेलिंगला कंटाळून १४ वर्षीय विद्यार्थिनीने जीवन संपवले

सोशल मीडियाच्या दडपणाची धक्कादायक किंमत; तीन अल्‍वयीनांवर गुन्‍हा दाखल
Blackmail Case
Blackmail Casepudhari photo
Published on
Updated on

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अवघ्या १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने कथित ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि परस्परांतील दबावतंत्रामुळे एका कोवळ्या जीवाने आयुष्य संपविल्याची ही घटना केवळ गुन्हेगारीचा विषय नसून, बदलत्या सामाजिक वास्तवावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुली आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी स्थानिक शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. मे महिन्यात तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर कुटुंबीयांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच मुलीच्या सोशल मीडिया खात्याची तपासणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. तक्रारीनुसार, पीडित मुलीला तिच्याच दोन अल्पवयीन मैत्रिणींनी मोबाईल फोन आणून दिला होता. त्यानंतर तिच्याकडे मोबाईल असल्याचे पालकांना सांगण्याची धमकी देण्यात येत होती.

Blackmail Case
Ketan Agarwal: लोहगड मृत्यू प्रकरणाला नवे वळण; केतन अग्रवाल प्रकरणात संशय वाढला

एका शिबिरातील व्हिडिओ पालकांकडे पाठवण्याची भीती दाखवत तिला वारंवार मानसिक दबावाखाली ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय एका अल्पवयीन मुलाकडूनही सातत्याने फोन करून त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या मानसिक छळामुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात तीन अल्पवयीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Blackmail Case
Kolhapur Crime | व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर चौघांकडून आठ महिने अत्याचार, मुरगूड पोलिसांत गुन्हा!

पालक, शाळा आणि समाजानेही घ्यावी जबाबदारी

ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजासाठी गंभीर इशारा आहे. मुलांच्या डिजिटल वापरावर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी सातत्याने संवाद साधणे, शाळांमध्ये समुपदेशनाची प्रभावी व्यवस्था उभारणे आणि मानसिक छळाच्या घटनांकडे गांभीर्याने पाहणे, ही काळाची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

कोवळ्या वयात वाढता मानसिक ताण चिंताजनक

या घटनेने अल्पवयीन मुलांमधील मोबाईलचा वाढता वापर, सोशल मीडियावरील दबाव, ब्लॅकमेलिंगची प्रवृत्ती आणि आभासी जगात निर्माण होणारे मानसिक तणाव पुन्हा एकदा समोर आणले आहेत. स्पर्धा, दिखावा, डिजिटल स्वीकाराची धडपड आणि समवयस्कांचा दबाव यामुळे अनेक मुले मानसिकदृष्ट्या असुरक्षित होत असल्याची चिंता शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news