Crime News : मित्राला पुण्याला पाठवून लावली मोबाईलची विल्हेवाट

लोंढे दारुच्या नशेत पडून मृत झाल्याची थाप; अक्षय शेटेला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

Crime News: Mobile Phone Disposed of After Sending Friend to Pune

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा निवृत्त प्रा. लोंढे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोड याने लोंढे यांच्या मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी कॉलेज जीवनातील मित्राचा वापर केल्याचे समोर आले आहे. लोंढे दारुच्या नशेत पडून मृत झाल्याचे खोटे सांगून त्याने मित्राला पुण्याला जाऊन मोबाईलमध्ये स्टेटस ठेवून नष्ट करण्यास सांगितले होते. गुन्हे अक्षय बाळकृष्ण शेटे (२४, रा. चित्तेगाव, पैठण) याला अटक केली. त्याला न्यायालयाने २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

crime news
Rajabhau Londhe murder case : रिल स्टार तरुणीसोबत २५ लाखांचा व्यवहार

आरोपी अक्षय शेटे शाखेने शनिवारी (दि. २१) चौथा आरोपी अधिक माहितीनुसार, प्रा. लोंढे यांची ५ मार्चच्या रात्री हत्या केल्यानंतर विशालने अक्षय शेटेशी संपर्क साधला. लोंढे यांचा दारुच्या नशेत पडून मृत्यू झाला आहे, असे खोटे सांगून त्याने अक्षयचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लोंढे यांचा मोबाईल देऊन त्याला पुण्याला जाण्यास सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाची दिशा भरकटवण्यासाठी विशालने अक्षयला मोबाईलवर व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यास आणि त्यानंतर तो फोन फोडून नष्ट करण्यास सांगितले होते. या कामासाठी त्याने अक्षयला काही रक्कमही दिली होती. त्यानुसार अक्षयने ८ मार्च रोजी पुण्यात जाऊन मोबाईलची विल्हेवाट लावली.

crime news
Drishyam Style Murder | छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्‍या करुन ‘दृश्यम’ स्टाईल बनाव, ५० लाखांच्या व्यवहारातून निवृत्त प्राध्यापकाला गोळी घालून संपवले!

या प्रकरणात आतापर्यंत मुख्य सूत्रधार विशाल राठोड, त्याचा मेहुणा आकाश पवार, करण आडे आणि आता अक्षय शेटे अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. विशाल आणि करण दोघांना रविवारी (दि. २२) न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर आकाश न्यायालयीन कोठडीत आहे. गुन्ह्याचा अधिक तपास एसीपी अशोक राजपूत करत आहेत.

बिर्याणी खायला आला अन् गजाआड झाला

आरोपी अक्षय शेटे शनिवारी उस्मानपुरा भागातील रमानगर येथील त्याच्या सासरवाडीत आला होता. याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रवीण वाघ, हवालदार राजेंद्र साळुंके, श्रीकांत काळे, राजेश यमदळ, अक्षय नाटकर, तातेराव शिनगारे यांच्या पथकाने आरोपी शेटे हा क्रांती चौक येथे गाड्यावर बिर्याणी खाण्यासाठी येताच त्याला उचलले.

अक्षय हा राठोडच्या हॉटेलवर होता कामाला

आरोपी विशाल राठोड याचे पूर्वी एक हॉटेल होते. तिथे सुद्धा अक्षय शेटे हा त्याच्याकडे कामाला होता. त्यानंतर त्याने हॉटेल बंद केल्याने अक्षय एका भांड्याच्या दुकानावर कामाला लागला. हे काम देखील त्याने काही दिवसांपूर्वी सोडून एका कापड दुकानावर कामाला जाणार होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news