Crime News : गुंगीकारक औषधांच्या ४१ गोळ्यांसह आरोपी जेरबंद

ही कारवाई रविवारी (दि. १७) करण्यात आली.
Arrest
Crime News : गुंगीकारक औषधांच्या ४१ गोळ्यांसह आरोपी जेरबंदpudhari photo
Published on
Updated on

Crime News: Accused arrested with 41 pills of narcotics

कन्नड, पुढारी वृत्तसेवा शहर पोलिस ठाणे हद्दीत गुंगीकारक औषधांच्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. १७) करण्यात आली.

Arrest
Beed Crime : डोळ्यात चटणी टाकून सोनाराला लुटणारी टोळी जेरबंद

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, बसस्थानक रोड परिसरात एक जण गुंगीकारक औषधांच्या गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या स्वतः जवळ बाळगून आहे. सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ कारवाई करण्यात आली.

निरजील मधुकर सुरे (वय २८, रा. नवजीवन कॉलनी, साने गुरुजी शाळेजवळ, कसबा, ता. कन्नड) असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईदरम्यान महसूल विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच पंच यांना सोबत घेऊन छापा टाकण्यात आला. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गुंगीकारक औषधांच्या गोळ्यांची विविध पॅकेट जप्त करण्यात आली. त्यामध्ये एकूण ४१ गोळ्या आढळून आल्या.

Arrest
Jalna Crime News : धारदार शस्त्रासह युवक जेरबंद, मुद्देमाल जप्त

आरोपीकडून वापरात असलेली दुचाकी व मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असून एकूण अंदाजे ७६,३४० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक पोलिस अधीक्षक अपराजित अग्निहोत्री यांच्या आदेशान्वये शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर. बी. सानप, सपोनि कुणाल सूर्यवंशी, पोहेका निंभोरकर, पोकॉ जोनवाल, सहाय्यक फौजदार नासेर पठाण व पोकॉ धोंडकर यांनी यशस्विरीत्या पार पाडली. कार्यवाहीदरम्यान तालुका दंडाधिकारी सारिका भगत या राजपत्रित अधिकारी म्हणून उपस्थित होते.

दरम्यान, तालुक्यात गुंगीकारक औषधांच्या गोळ्या विक्री होत असल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनी यापुढे ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ना वैध परवाना, ना प्रिस्क्रिप्शन

सदर आरोपीकडे गुंगीकारक औषधांच्या गोळ्या बाळगण्याबाबत कोणताही वैध परवाना अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रिस्क्रिप्शन आढळून आले नाही. औषध निरीक्षकांनी प्राथमिक पडताळणीत सदर गोळ्या या नशा निर्माण करणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या श्रेणीत येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news