Sambhajinagar News ; उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करा

विभागीय आयुक्तांचे मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
industry
लघु उद्योगfile photo
Published on
Updated on

Create a conducive environment for industries

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी औद्योगिक विकासाला चालना देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे विभागातील उद्योगांशी संबंधित विविध समस्या तत्परतेने सोडवून उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करा, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

industry
Sambhajinagar News : खड्ड्यांतच स्विमिंग पूल, काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) संदर्भातील विविध समस्या आणि उपाययोजनांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे बुधवारी (दि.५) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, औद्योगिक संघटना आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विभागातील एकूण औद्योगिक भूखंड, वाटप झालेली व शिल्लक भूखंड, बंद पडलेल्या उद्योगांची कारणे तसेच औद्योगिक विकासातील अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्त म्हणाले, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मार्फत दर्जेदार तांत्रिक व व्यवहारिक कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआय महाविद्यालयांना आवश्यक त्या सर्व सेवासुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्याच्या सूचना केल्या.

industry
FDA : एफडीए'ला उच्च न्यायालयाचा दणका

उद्योगांसाठी संरक्षणात्मक उपायोजना

बाहेरून येणारे उद्योग कोणत्याही अडचणींमुळे बंद पडणार नाहीत किंवा जिल्हा सोडून जाणार नाहीत, यासाठी आवश्यक त्या कठोर संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही दिले. एमआयडीसी क्षेत्रातील भूखंडाचे वाटपानंतर उद्योग उभारणीसाठी अनावश्यक परवानग्या अधिक सुलभ व वेगवान करावी. तसेच मुदतीत सुरू न झालेल्या उद्योगांबाबत कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news