crime news : गोरक्षकांचा फुलंब्री पोलिसांवर हल्ला

वैजापूरकडून येणाऱ्या गोवंश जनावरांच्या पिकअपचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांनी फुलंब्री परिसरात मोठा राडा केला.
sambhajinagar crime news
गोरक्षकांचा फुलंब्री पोलिसांवर हल्लाFile Photo
Published on
Updated on

Cow vigilantes attack Phulambri police

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूरकडून येणाऱ्या गोवंश जनावरांच्या पिकअपचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांनी फुलंब्री परिसरात मोठा राडा केला. या गोंधळादरम्यान गोरक्षकांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच पिकअप टेम्पो पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

sambhajinagar crime news
Bees Attack : अजिंठा लेणीत सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला

विशेष म्हणजे, या जमावाला चिथावणी देत ठाण्यात राडा करत अंमलदाराच्या कानशिलात मारणाऱ्या शहर गुन्हे शाखेच्या एका उपनिरीक्षकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश अप्पासाहेब शेळके (रा. पळशी), सुरज कैलास जाधव (रा. दौलताबाद), पवन जयाजी जंजाळ (रा. रामपूरवाडी), अमितसिंग, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटोदकर व इतर २० अशी आरोपींची नावे असून, फुलंब्री पोलिस ठाण्यात या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sambhajinagar crime news
शिवजन्मोत्सव सोहळ्याने अवघे शहर शिवमय...

पोलिसांच्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी रात्री डायल ११२ वर गोवंश तस्करीची माहिती मिळाली होती. त्यानुसार फुलंब्री पोलिसांनी धाव घेतली. समृद्धी टोलनाका परिसरातील पिकअप टेकडावर (एमएच-२०-ईजी-४९४५) अपघाती अवस्थेत मिळून आली. यावेळी तिथे जमा झालेल्या २० ते २५ गोरक्षकांनी पोलिस निरीक्षक संजय सहाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाई करण्यापासून रोखत हुज्जत घातली.

गोरक्षकांचा नेता गणेश शेळके याने पोलिसांना तुम्ही भाड खातात, अशी शिवीगाळ करत पोलिस निरीक्षक सहाणे यांना धक्का दिला. जमावाने पिकअपवर दगडफेक करून काचा फोडल्या आणि पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सपोनि मुऱ्हाडे आणि पीएसआय चाटे यांना धक्काबुक्की करण्यात आली, तर एका पोलिस कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकाचे निलंबन

शहर गुन्हे शाखेत कार्यरत उपनिरीक्षक नवनाथ पाटोदकर याच्यावर फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पाटोदकरचे तात्काळ निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news