Final Budget : महापौरांच्या अंतिम अर्थसंकल्पाकडे नगरसेवकांचे लक्ष

स्वेच्छा निधी, प्रभाग विकास कामांसह नव्या योजनांबाबत उत्सुकता
Chhatrapati Sambhajinagar
Final Budget : महापौरांच्या अंतिम अर्थसंकल्पाकडे नगरसेवकांचे लक्षFile Photo
Published on
Updated on

Councilors' Attention Focused on Mayor's Final Budget

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या बदलाकडे सध्या नगरसेवकांचे लक्ष लागले असून महापौर कोणत्या प्राधान्यक्रमांसह अंतिम अर्थसंकल्प सादर करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. विशेषतः नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीत वाढ होणार का, प्रभागनिहाय विकास कामांसाठी अधिक निधी मिळणार का आणि नवीन प्रकल्पांचा समावेश करण्यात येणार का, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : तिजोरीवर कर्जाचे ओझे, तरी मनपा अधिकाऱ्यांचे परदेश दौरे

स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी प्रशासनाच्या मूळ अर्थसंकल्पाचा सखोल अभ्यास करून त्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचविले. यात मकरिये यांनी नगरसेवकांसाठी स्वतंत्र स्वेच्छा निधीची तरतूद करत प्रत्येक प्रभागाला विकास कामांसाठी सुमारे तीन ते सव्वातीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल, याची काळजी घेतली.

याशिवाय शहरातील ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पासाठी तब्बल १२४ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली. या सुधारणांमुळे प्रशासनाच्या मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत सभापतींचा सुधारित अर्थसंकल्प सुमारे १३० कोटी रुपयांनी वाढला. स्थायी समितीने मंजूर केलेला हा सुधारित अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता.

Chhatrapati Sambhajinagar
Plastic-Free City : प्लास्टिकमुक्त शहरासाठी मनपाची जनजागृती मोहीम

त्यावेळी अर्थसंकल्प अंतिम करण्याचे अधिका महापौर समीर राजूरकर यांना बहाल करण्यात आले त्यानंतर महापौर राजूरकर यांनी अर्थसंकल्पावर स्वतंत्र पातळीवर काम सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली मात्र अंतिम तरतुदींबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

स्वेच्छा निधीत वात झाली का, प्रभागनिहाय विकास आराखड्यात बदल् करण्यात आले का, तसेच नव्या योजनांना प्राधान्य देण्यात आले का, याबाबत नगरसेवकांमध्ये उत्सुकत कायम आहे. आगामी सर्वसाधारण सभेपूर्वी किंव सभेदरम्यान महापौर राजूरकर अंतिम अर्थसंकल्प जाही करतील, अशी शक्यता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news