

Could your forgetfulness be Alzheimer's?
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर: अल्झायमर म्हणजेच स्मृतीभ्रंश! वृद्धापकाळात आढळणारा हा आजार आता ४० ओलांडलेल्या तरुणांनाही आपल्या विळख्यात घेऊ लागला आहे. दुचाकीची किल्ली किंवा घरातील वस्तू कुठे ठेवली हे विसरणे, काल कोणती भाजी खाली हे लवकर न आठवणे हे सामान्य आहे. परंतु वारंवार असे होत असेल आणि क्लू देऊनही गोष्टी आठवत नसतील. तर मात्र, दुर्लक्ष नको.
असा विसराळूपणा हळूहळू वाढून अल्झायमर रूप धारण करतो; ज्यामध्ये व्यक्ती आपल्या घराचा पत्ता, स्वतःचे घर आणि अगदी जवळच्या नातेवाईकांचे चेहरे व नावेही विसरून जातो. त्यामुळे मेंदूला अॅक्टीव्ह ठेवा, यासाठी वाचन-लेखनसोबतच पड़ाल्स-शब्दकोडे सोडवणे आणि कोणताही छंद जोपावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
जागतिक अल्झायमर डे
दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी 'जागतिक अल्झायमर जागरूकता दिन' पाळला जातो. वयोमानानुसार विसराळूपणा येतोच असा सर्वसामान्य समज असल्यामुळे बहुतांश लोक सुरुवातीच्या विस्मरणाला गांभीयनि घेत नाहीत. मात्र, बदलती जीवनशैली आणि तणावामुळे आता तरुण वयातही हा आजार मूळ धरू लागला आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे कठीण असलेला हा आजार वेळेत न ओळखल्यास पुढे गंभीर रूप धारण करतो. या आजारात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. साध्या साध्या गोष्टींचा विसर पडणे, नुकत्याच घडलेल्या घटना न आठवणे, एकच गोष्ट वारंवार सांगणे आणि दैनंदिन कामे करताना गोंधळ उडणे ही याची प्राथमिक लक्षणे आहेत. आजार गंभीर टप्प्यात पोहोचल्यास रुग्ण आक्रमक होतो, चिडचिड करतो आणि नैसर्गिक विधींवरील नियंत्रणही सुटते.
अनुवंशिकता आणि बदलती जीवनशैली ही या आजाराची प्रमुख कारणे मानली जातात, यावर कोणताही विशिष्ट पूर्ण उपचार उपलब्ध नसला, तरी योग्य वेळी मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे आणि सकारात्मक जीवनशैलीमुळे या आजाराची लक्षणे पुढे ढकलणे व त्याचा वेग मंदावणे शक्य होते, असेही तज्ज्ञ म्हणाले.