जिल्ह्यातील रोहयोची अपूर्ण कामे समन्वयाने पूर्ण करा : मंत्री गोगावले

रोहयो विभागाच्या विविध विकासकामांचा घेतला विभागीय आढावा
sambhajinagar news
जिल्ह्यातील रोहयोची अपूर्ण कामे समन्वयाने पूर्ण करा : मंत्री गोगावलेfile photo
Published on
Updated on

Complete Pending EGS Works in the District Through Coordination: Minister Gogawale

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) सुरू असलेली अपूर्ण कामे समन्वय आणि गतिशीलतेने तातडीने पूर्ण करावीत, तसेच गोरगरीब लाभार्थी व शेतकरी बांधवांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे निर्देश रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

sambhajinagar news
Bogus QR code : जिल्हाधिकाऱ्यांमुळेच बोगस क्यूआर कोड उघडकीस

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सोमवारी (दि.६) रोहयो विभागाच्या विविध विकासकामांचा विभागीय आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार रमेश बोरणारे, विलास भुमरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

मंत्री गोगावले म्हणाले, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रभावीपणे काम करून घेण्यासाठी समन्वय राखावा. अपूर्ण कामांचा नियमित आढावा घेण्यासाठी क्षेत्रभेटी कराव्यात. पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या समन्वयातून सर्वसामान्य मजूर व शेतकऱ्यांना विकासकामांचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

sambhajinagar news
जालना जिल्हा बालकामगारमुक्त करण्यासाठी कामाची गती वाढवा : जिल्हाधिकारी मित्तल यांचे निर्देश

मजूर मस्टर सुरू करण्याची मागणी

आमदार विलास भुमरे यांनी पंचायत समिती स्तरावर नियमित आढावा घेण्याची गरज व्यक्त केली. तर आमदार रमेश बोरणारे यांनी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विहिरी, शेततळे, मातोश्री पाणंद रस्ते, घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून मजूर मस्टर सुरू करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news