Beed News | आष्टीत शांतता समितीच्या बैठकीतच अशांतता; गणेश मंडळांच्या निमंत्रणावरून नाराजी

काही मंडळांना बैठकीचे निमंत्रण नसल्याने प्रश्नचिन्ह; अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय
Ashti Peace Committee Meeting
आष्टी पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीतच गोंधळाचे चित्र निर्माण झाले Pudhari
Published on
Updated on

Ashti Peace Committee Meeting

कडा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच उत्सवाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने आष्टी पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीतच गोंधळाचे चित्र निर्माण झाले. काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर बैठक व्यवस्थेअभावी उपस्थित नागरिक आणि पदाधिकाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपकांचा वापर, वाहतूक नियोजन, मंडप उभारणी आणि गणेशमूर्ती विसर्जन यांसारख्या बाबींमध्ये गणेश मंडळांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित करून त्यांच्याशी समन्वय साधणे अपेक्षित होते. मात्र, काही मंडळांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचे समोर आल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Ashti Peace Committee Meeting
Beed News : पाच एकर सोयाबीनवर फिरवला रोटावेटर

सर्व मंडळांना विश्वासात घेऊन उत्सवाचे नियोजन करण्याऐवजी काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला. या प्रकारामुळे पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांमधील समन्वयाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे गैरसोय

बैठकीसाठी आलेल्या नागरिक आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याचेही दिसून आले. भर उन्हात बैठक सुरू असताना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने उपस्थितांना त्रास सहन करावा लागल्याची चर्चा आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर टीका होत आहे.

Ashti Peace Committee Meeting
Beed news: कुटुंबाचा खर्च, कमी पगार अन् कर्जाचे ओझे; एसटी चालकाने संपवले जीवन; आष्टी बसस्थानकातील घटना

समन्वयाचा अभाव दूर करण्याची गरज

गणेशोत्सव काळात पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे. एखाद्या मंडळाला बैठकीपासून वगळण्यात आल्याची भावना निर्माण झाल्यास गैरसमज वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आगामी नियोजनात सर्व गणेश मंडळांना समान पद्धतीने विश्वासात घेण्याची मागणी होत आहे.

बैठकीसाठी मंडळांची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली, काही मंडळांना निमंत्रण का देण्यात आले नाही आणि पुढील नियोजनात सर्व मंडळांना सहभागी करून घेतले जाणार का, याबाबत पोलिस प्रशासनाकडून स्पष्टता अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news