Sambhajinagar News : उद्योगांसोबत दर तीन महिन्यांनी संवाद बैठक : जिल्हाधिकारी

औद्योगिक विकास, कौशल्य, पायाभूत सुविधांसह कनेक्टिव्हिटीवर भर
Sambhajinagar News
Sambhajinagar News : उद्योगांसोबत दर तीन महिन्यांनी संवाद बैठक : जिल्हाधिकारी file photo
Published on
Updated on

Communication meeting with industries every three months : Collector

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील औद्योगिक विकास, भविष्यातील नियोजन, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा आणि उद्योगांना आवश्यक असलेले सहकार्य प्रशासनाकडून नेहमीच राहील. यासाठीच उद्योग-प्रशासनातील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी दर तीन महिन्यांनी संवाद बैठक आयोजित करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शनिवारी (दि. ११) सीएमआयएच्या पुढाकाराने आयोजित संवाद कार्यक्रमात दिले.

Sambhajinagar News
Samruddhi Corridor : 'समृद्धी' लगतच्या ४२ गावांचा होणार नियोजनबद्ध विकास

छत्रपती संभाजीनगर हे देशातील महत्त्वाचे उत्पादन व ईव्ही उद्योग केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असून, प्रशासन आणि उद्योगांच्या सहकार्याने या विकासाला अधिक गती मिळेल. जिल्ह्याचा सकल जिल्हा अंतर्गत उत्पादन (जीडीडीपी) दुप्पट करण्यासाठी उद्योग क्षेत्राची भूमिका निर्णायक राहणार आहे. नीती आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या 'मित्रा' उपक्रमांतर्गत संभाजीनगर ग्रोथ हब विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

यासह कौशल्य विकास, पीएम सेतू योजना, विमानतळ विस्तार, ऑरिक परिसराची कनेक्टिव्हिटी आणि प्रस्तावित रिंग रोड याबाबत सविस्तर माहिती दिली. उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकासावर भर देत प्रशासन उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Sambhajinagar News
Parbhani News : स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांची कोंडी

यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष अथर्वेशराज नंदावत, मानद सचिव अजिंक्य सावे, उपाध्यक्ष मिहीर सौन्दलगेकर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत उद्योग विकास, धोरणात्मक पाठपुरावा, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, निर्यात प्रोत्साहन आणि उद्योग-अनुकूल वातावरण निर्मितीसाठी सीएमआयए सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.

डिस्ट्रिक्ट एक्स्पोर्ट हबमध्ये समावेश करा

संवाद सत्रात ५० हून अधिक उद्योजकांनी शहरातील पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्रातील विविध समस्यांवर सूचना मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ऋषिकेश जाजू यांनी सूत्रसंचालन करताना संभाजीनगरचा डिस्ट्रिक्ट एक्स्पोर्ट हबमध्ये समावेश करण्यासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. आनंद मोदानी यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news