Ajanta Ghat Accident : अजिंठा घाटात तीन अवजड वाहनांची धडक; पाच तास वाहतुकीचा चक्काजाम

छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात सोमवारी (दि. १२) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तीन अवजड वाहनांचा तिहेरी अपघात झाला.
Ajanta Ghat Accident
Ajanta Ghat Accident : अजिंठा घाटात तीन अवजड वाहनांची धडक; पाच तास वाहतुकीचा चक्काजामfile photo
Published on: 
Updated on: 

Collision involving three heavy vehicles in Ajanta Ghat; Five-hour traffic jam

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात सोमवारी (दि. १२) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तीन अवजड वाहनांचा तिहेरी अपघात झाला. एका आयशर ट्रकमध्ये बिघाड झाल्यानंतर पाठीमागून आलेल्या दुसऱ्या आयशरने त्याला धडक दिली.

Ajanta Ghat Accident
Marathwada Drought : इतिहासाच्या पानांतून : सव्‍वाशे वर्षापूर्वीचा एका छायाचित्रातील दुष्काळ

त्याचवेळी ब्रेक निकामी झालेल्या अवजड ट्रेलरने या दोन्ही वाहनांना धडक दिल्याने अपघाताची तीव्रता वाढली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त वाहने घाटातील अरुंद वळणावर अडकल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल पाच तास विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंना तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण आणि नवरात्रोत्सवासाठी देवदर्शनाला निघालेल्या भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

बिघाड झालेल्या ट्रकला धडक; ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलर अनियंत्रित छत्रपती संभाजीनगरकडून जळगावच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (एमएच २० सीटी २५७४) अजिंठा घाटातील ब्लाइंड स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुंद व अवघड वळणावर बिघाड झाल्याने बंद पडला होता.

Ajanta Ghat Accident
Corporators Disqualification Case : नगरसेवक अपात्रताप्रकरणी आठ तक्रारींवर सुनावणी

त्याचवेळी पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने (एमएच ०४ ईवाय ४९८१) उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दुसऱ्या आयशरच्या समोरील कॅबिनचा चुराडा झाला. दरम्यान, लोखंडी आसारी घेऊन जळगावकडे जाणाऱ्या ट्रेलरचे (जीजे ३९ टीबी ९१७८) ब्रेक निकामी झाल्याने तो अनियंत्रित झाला आणि त्याने दोन्ही आयशर ट्रकला धडक दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news