Corporators Disqualification Case : नगरसेवक अपात्रताप्रकरणी आठ तक्रारींवर सुनावणी

अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांसह अपत्यांचा मुद्दा ऐरणीवर : पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला
Corporators Disqualification Case
Corporators Disqualification Case : नगरसेवक अपात्रताप्रकरणी आठ तक्रारींवर सुनावणीfile photo
Published on: 
Updated on: 

Hearing on eight complaints regarding the disqualification of corporators

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांपैकी २५ जणांच्या सदस्यत्वाला विविध तक्रारींमुळे आव्हान देण्यात आले आहे.

Corporators Disqualification Case
Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन द्या - शिक्षक समिती

या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने सोमवारी (दि. १२) आठ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे आणि दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या मुद्द्यांवर दाखल तक्रारींचा यात समावेश आहे.

या प्रकरणांवरील पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १० (१) व १० (१-ड) नुसार नगरसेवकांच्या सदस्यत्वाच्या वैधतेबाबत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Corporators Disqualification Case
Marathwada Drought : इतिहासाच्या पानांतून : सव्‍वाशे वर्षापूर्वीचा एका छायाचित्रातील दुष्काळ

तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागामार्फत सुनावणी घेतली जात आहे. दरम्यान, सोमवारी सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या आठ प्रकरणांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका फरजाना शेख गुलाम रसूल, मुन्शी भिकन शेख, पठाण मझहर पठाण अय्युब, अली मिर वाजिद, अशोक हिरवाळे, मनपा विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद आणि भाजपचे स्वामी विश्वनाथ गुरुलिंग यांच्याशी संबंधित प्रकरणांचा समावेश होता.

या प्रकरणांत अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे तसेच दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या मुद्द्यांवर तक्रारी करण्यात आल्या आहेत. नगरसेवक सदस्यत्वाच्या अपात्रतेबाबत सुनावणीची प्रक्रिया अद्याप सुरू असून, सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर आता १६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कोणती भूमिका मांडली जाते आणि प्रकरणे कोणत्या दिशेने पुढे जातात, याकडे संबंधित नगरसेवकांसह तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.

२५ नगरसेवकांविरोधात तक्रारी

महापालिकेच्या ११५ नगरसेवकांपैकी २५ नगरसेवकांविरोधात विविध कारणांवरून तक्रारी दाखल आहेत. संबंधितांना अपात्र ठरविण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने नोटिसा बजावून सुनावणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news