अल्पवयीन खेळाडूवर लैंगिक अत्याचार करणारा प्रशिक्षक गजाआड

वेदांतनगर पोलिसांची बालानगरमध्ये कारवाई
 Sexual Abuse
अल्पवयीन खेळाडूवर प्रशिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : खो-खोच्या अल्पवयीन खेळाडूवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये नेवून बळजबरीने अत्याचार करणाऱ्या प्रशिक्षकाला वेदांतनगर पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी बेड्या ठोकल्या. बालानगर (ता. पैठण) येथे बुधवारी (दि.१६) ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण यादव यांनी दिली.

शिवाजी जगन्नाथ गोर्डे (३८, रा. बालानगर, ता. पैठण), असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो विवाहित असून त्याला तीन अपत्ये आहेत. पीडितेच्या वयाची त्याला मुलगी असल्याचेही पोलिसांनी सांगितले. याशिवाय, द पंजाब ग्रेट हॉटेलची मालकीन पूजा रोहित राठोड आणि व्यवस्थापक सादिक मिर्झा बेग हेदेखील या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांनाही अटक केली जाणार आहे.

 Sexual Abuse
Abuse minor girl kolhapur : खाऊसाठी दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अधिक माहितीनुसार, १३ वर्षे १० महिने वयाच्या शाळकरी मुलीची राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांसाठी खो-खो संघात निवड झालेली आहे. तिला स्पर्धेसाठी घेऊन जाताना आरोपी शिवाजी गोरडे याने तिला दुचाकीने संभाजीनगरात आणले. रात्री १० वाजता रेल्वे असल्याचे सांगून तिला द पंजाब ग्रेट हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला. तेथे रुम बूक केली. तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतरही आरोपी गावात तिला त्रास द्यायला लागला होता. दरम्यान, याबद्दलची माहीती पिडितेच्या आईला कळताच १५ ऑक्टोबर रोजी वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक प्रवीण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक संगीता गिरी, उपनिरीक्षक वैभव मोरे, अंमलदार बाळाराम चौरे, रणजित सुलाने, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, विलास डोईफोडे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला. १६ ऑक्टोबर रोजी त्याला अटक केली.

शेतात जीवन संपवण्याचा केला प्रयत्न

आरोपी शिवाजी गोर्डे याच्यावर बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल झाल्यावर वेदांतनगर पोलिस त्याच्या अटकेसाठी बालानगरला रवाना झाले. मात्र, तो रात्री गावात सापडला नाही. पोलिस त्याचा शोध घेत असताना बुधवारी तो शेतात असल्याची माहिती मिळाली. पोलिस तिकडे गेले असता तो गळफास घेत असल्याचे दिसले. ज्या फांदीला तो लटकला होता ती फांदी तुटल्याने आणि योग्यवेळी पोलिस तेथे दाखल झाल्यामुळे त्याचा जीव वाचला, असे निरीक्षक यादव यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news