

Cloudburst in Sillod taluka, ten villages lost contact
घाटनांद्रा, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरातील धारला, चारणेर, पेंडगाव, चारणेरवाडी, आमठाणा, केळगाव, धावडा, धारला आदी गावांसह आमठाणा मंडळांमध्ये सोमवारी (दि.१५) पहाटे ढगफुटी होऊन ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी ढगफुटी झाल्याने सर्वत्र हाहाकार माजला. घाटनांद्रा, पेंडगाव, धारला, चारनेर, चारणेवाडी, धावडा, देऊळगाव बाजार, केळगाव, आधारवाडी, कोराळा तांडा या दहा गावांचा संपर्क तुटला होता.
पावसामुळे पुणे मार्गावरील तीन बस रद्द
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रात्रीपासूनच मुंबई पुणे येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर येथून पुणे मार्गावर धावणाऱ्या सोमवारी (दि.१५) तीन बस रद्द केल्या असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली. येथून पुणे मार्गावर दर अर्ध्या तासाला बस उपलब्ध आहे.
शेतात पाणी शिरले
सकाळपासून विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह झालेल्या तुफान ढगफुटीसदृश्य पावसामुळे स्थानिक नदी-नाल्यांना पूर येऊन पुलावरून पाणी वाहत होते. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने मका, कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
घरांत पाणी शिरले
धारला, घाटनांद्रा, चारणेर, आमठाणा, देऊळगाव बाजार या गावांतील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. धारला येथे एक घर पावसामुळे पडले आहे.