Doctor Strike : डॉक्टरांच्या संपामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर

दुसऱ्या दिवशी हजारो रुग्णांचे हाल; अडीच हजार शस्त्रक्रिया ढकलल्या पुढे
Doctor Strike
Doctor Strike : डॉक्टरांच्या संपामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवरfile photo
Published on
Updated on

City's healthcare system on life support due to doctors' strike

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: खासगी डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली असून, संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.५) ८० ते ९० टक्के डॉक्टरांची ओपीडी सेवा बंद राहिल्याने दहा हजारांहून अधिक रुग्णांना याचा मोठा फटका बसला. तर लहान-मोठ्या अडीच हजार नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने या रुग्णांच्या वेदना आणि त्यांच्या नातेवाइकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून आपत्कालीन सेवाही बंद करण्याचा इशारा आयएमएकडून देण्यात आला आहे.

Doctor Strike
Dead Rat : सीईओंच्या दालनात मेलेला उंदीर अखेर सापडला

बीएसएमएस आणि सीसीएमपी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए), एमआरडीसह इतर अलोपॅथी संघटनाकडून मंगळवारी सकाळी ६ वाजेपासून २४ तासांचे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र यानंतरही मागण्यांबाबत शासनाकडून कोणतीही सकारात्मक प्रतिसाद न आल्यामुळे अखेर बुधवारी सकाळी ६ वाजेपासून बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली.

या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी शहरातील खासगी डॉक्टरांची ओपीडी सेवा बंद राहिल्याने हजारो रुग्णांसह नातेवाइकांचेही हाल झाले. या संपामुळे खासगी डॉक्टरांकडील लहान-मोठ्या अडीच हजार नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक दूरवरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आंदोलनादरम्यान रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवा आणि इमर्जन्सी विभाग सुरू होते.

Doctor Strike
Sambhajinagar News : रहिवाशांना बाहेर काढत धोकादायक इमारतींवर हतोडा

घाटीत २,२६७ रुग्णांची तपासणी

खासगी रुग्णालयांच्या ओपीडी बंद राहिल्यामुळे घाटी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गर्दी झाली. बुधवारी ओपीडीत २,२६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर नियोजित ४७ पैकी ४१ शस्त्रक्रिया पार पडल्या, तर ६ शख्यक्रिया रुग्ण अनफिट आणि संसर्गसह अन्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या.

या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत घाटीतील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्सच्या (मार्ड) डॉक्टरांनी बुधवारी काम बंद आंदोलन पुकारले.

.. तर आजपासून आपात्कालीन सेवाही बंद

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयएमएकडून बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले. यानंतर दुपारी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्यास ठाम विरोध आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवावी. सरकारकडून ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन तीव्र करून उद्या गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून आपत्कालीन सेवाही बंद करण्यात येतील, असेही स्पष्ट केले. यावेळी डॉ. केदार साने, डॉ. योगेश लक्कस, डॉ. विनायक खेडकर, डॉ. अक्षय मारावार, डॉ. उज्ज्वला दहीफळे, डॉ. सोनाली सावजी, डॉ. अर्चना साने यांच्यासह डॉक्टरांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news