Police sports competition : शहर पोलिसांनी सलग तिसऱ्या वर्षी पटकावले जनरल चॅम्पियनशिप विजेतेपद

३६ वी परिक्षेत्रिय पोलिस क्रीडा स्पर्धेचा उत्साहात समारोप
Police sports competition
Police sports competition : शहर पोलिसांनी सलग तिसऱ्या वर्षी पटकावले जनरल चॅम्पियनशिप विजेतेपदFile Photo
Published on
Updated on

City Police wins General Championship title for third consecutive year

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : यंदा शहर पोलिस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३६ वी परिक्षेत्रिय पोलिस क्रीडा स्पर्धेत शहर पोलिसांनी बर्चस्व गाजवत सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेत वर्चस्व कायम ठेवत जनरल चॅम्पियनशिप हे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचा शुक्रवारी (दि. १४) देवगिरी क्रीडा मैदानावर समारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Police sports competition
Sambhajinagar News : मनपात १५ डिसेंबरपासून सुरू होणार ई-टीडीआर

याप्रसंगी विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र मिश्र हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे एसपी नवनीत कॉवत, जालना एसपी अजय बन्सल आणि धाराशिवच्या एसपी रितू खोकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण, बीड, जालना व धाराशिव या पोलिस विभागातील संघ व खेळाडू सहभागी झाले होते. समारोप समारंभाप्रसंगी सर्व सहभागी संघांनी पथसंचलन केले. त्याचे नेतृत्व शहर पोलिस दलातील हॉकीपटू आजम शेख यांनी केले. प्रमुख मान्यवरांनी संघ व खेळाडूंना आगामी महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेत चांगले यश मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, शर्मिष्ठा घोरगे, प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. समार- ोपानंतर विजेत्यांना पदके व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. २०० मोटर स्पर्धेतील विजेते बाबासाहेब मंडलिक (शहर) आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूच्या मानकरी शिल्पा नाहकर (बीड) या दोघांना बक्षीस म्हणून दुचाकी वाहन देण्यात आले.

Police sports competition
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भाजप कार्यालयाचे उद्घाटन

स्पर्धेतील विजेते

साांधिक क्रीडा प्रकार पुरुष गट हॉकी: छत्रपती संभाजीनगर शहर (गोल्ड) आणि धाराशिव (सिल्व्हर). फुटबॉल : जालना (गोल्ड) आणि छत्रपती संभाजीनगर शहर (सिल्व्हर). हॅन्डबॉल : बीड (गोल्ड) आणि छत्रपती संभाजीनगर शहर (सिल्व्हर). बास्केटबॉल : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (गोल्ड) आणि बीड (सिल्व्हर). कबड्डी : छत्रपती संभाजीनगर शहर (गोल्ड) आणि धाराशिव (सिल्व्हर). खो-खो : बीड (गोल्ड) आणि छत्रपती संभाजीनगर शहर (सिल्व्हर). व्हॉलीबॉल : बीड (गोल्ड) आणि छत्रपती संभाजीनगर शहर (सिल्व्हर). सांघिक क्रीडा प्रकार महिला गट बास्केटबॉल : छत्रपती संभाजीनगर शहर (गोल्ड) आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (सिल्व्हर).

कबड्डी : छत्रपती संभाजीनगर शहर (गोल्ड) आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (सिल्व्हर).

खो-खो : छत्रपती संभाजीनगर शहर (गोल्ड) आणि बीड (सिल्व्हर). व्हॉलीबॉल छत्रपती संभाजीनगर शहर (गोल्ड) आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (सिल्व्हर).

पुरुष क्रिकेट स्पर्धा

विजेता (गोल्ड): परिमंडळ-२ (कर्णधार : डीसीपी प्रशांत स्वामी). उपविजेता (सिल्व्हर) : परिमंडळ-१ (कर्णधार : एसीपी सागर देशमुख). महिला क्रिकेट स्पर्धा

विजेता (गोल्ड): स्पार्कलिंग स्टार (कर्णधारः डीसीपी शर्मिष्ठछ घारगे). उपविजेता (सिल्व्हर): राइजिंग स्टार (कर्णधारः सुनिता मिसाळ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news