

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा तर मिळाला, परंतु तब्बल ९ वर्षानंतरही येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झालेली नाही. त्यासाठी आवश्यक असलेले इमिग्रेशन चेक पोस्ट तसेच आंतरराष्ट्रीय कार्गो से- वेसाठी लागणारी यंत्रणाही उपलब्ध झाली नसल्याने चिकलठाणा विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा केवळ कागदावरच उरला आहे. त्यामुळे परदे शात जाणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना मुंबई किंवा पुण्यातील थांब्यांचीच मदत घ्यावी लागत आहे
छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विमानतळाचा दर्जा २४ फेब्रुवारी २०१५ रोजी मिळाला. एशिया एअर लाईनने ऑक्टोबर २०२४ पासून बँकॉक, मलेशिया आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची घोषणा नुकतीच केली होती. मात्र, विमानतळ प्रशासनाला इमिग्रेशन चेक पोस्ट, आंतरराष्ट्रीय कार्गो साठी लागणारी यंत्रणा उपलब्ध करता आली नसल्याने या विमान कंपनीला आपला निर्णय रद्द करावा लागला.
येथील विमानतळावर नाइट लैंडिंग सिस्टम, जीपीएस गायडन्ससह लिंक आयलेक यंऋणा उपलब्ध करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे व्हिजिविलिटी सुमारे एक किलोमीटरपर्यंतची वाढली आहे. या सुविधांमुळे आता वाईट हवामानातही विमान लँड करण्यास अडचणी येत नाहीत. या सुविधांमुळे चोवीस तास सेवा देण्यास विमानतळ सज्ज आहे, परंतु येथील राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे आजही येथील विमानतळाला रात्रीच्या विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा देण्यासाठी लागणारे मेटल डिटेक्टर, एक्सरे मशीन, कन्व्हेनर बेल्ट उपलब्ध करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेसाठी लागणारे कार्यालय केवळ बनवण्यात आले आहे. त्यासाठी लागणारी साधन सामग्री अद्याप प्राप्त झाली नाही. कार्गो सेवा तसेच इमिग्रेशन चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय विमानसेवेला अडसर ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासनाबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिंचे पाठबळ असणे गरजेचे आहे. ते कुठे तरी कमी पडत आहे. त्यामुळे अद्यापही येथून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होऊ शकली नाही.
जसवंतसिंग राजपूत औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन
पहिल्या टप्प्यात १९९५ मध्ये ६० एकरचे भूसंपादन करून त्याचा मोबदलाही दिला. विमानतळ विस्तारीकरणासाठी आणखी १३९ एकरचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया २०२२ पासून सुरू आहे. आतापर्यंत केवळ जमीन मोजणी झाली आहे. त्याचा मोबदला आणि भूसंपादनाचे काम अडगळीत पडल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.
बापूसाहेब दहिहंडे पाटील शेतकरी, चिकलठाणा