

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रभार रचनेवर दाखल आक्षेपांच्या सुनावणीला सोमवार (दि.4) रोजीपासून विभागीय आयुक्त कार्यालयात सुरुवात झाली. आठ जिल्ह्यांतून एकूण २८८ आक्षेप दाखल झाले आहेत. ही सुनावणी पढील तीन दिवस चालणार आहे.
जिल्हानिहाय दाखल आक्षेप
छत्रपती संभाजीनगर: ४८
परभणी : ११
जालना: २५
हिंगोली : ०७
नांदेड : ९२
बीड : ६६
लातूर : २७
धाराशिव १२
सर्वोच्च न्यायालयाच्या आदे-शानुसार राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका होणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रभार रचना तयार करून त्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
त्यावर आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी काही अवधी देण्यात आला होता. या अवधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २८८ आक्षेप दाखल झाले. यावेळी विभागात जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे १२ गण वाढले असून त्यानुसार प्रभाग रचना झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार दि. ४ ऑगस्टपासून आक्षेपांवरील सुनावणीला सुरुवात झाली. विभागीय अप्पर आयुक्त अनंत गव्हाणे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली तर प्रभारी अप्पर आयुक्त संभाजी अडकुणे यांच्याकडे नांदेड, बीड, धाराशिव व लातूर या जिल्ह परिषद गटरचने प्रकरणी आलेल्या आक्षेपांची सुनावणी होणार आहे. ४ ऑगस्ट रोजी जालना व लातूर जि. प. आक्षेपांची सुनावणी झाली. ५ रोजी परभणी, बीड, धाराशिव, ६ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर व हिंगोली तर ७ रोजी नांदेड जि.प.गट रचनेप्रकरणी सुनावणी होईल.
एखादे गाव आधी वेगळ्या गटात होते, आता दुसऱ्या गटात जोडले गेले आहे. काही गटात वाढीव लोकसंख्येमुळे सीमा बदलल्या आहेत. वाढीव लोकसंख्या व मतदार कुठल्या न कुठल्या प्रभागात अतिरिक्त टाकावे लागले आहेत. त्यावरच अधिक आक्षेप असल्याचे सूत्रांनी सांगितले.