

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार मात्र मगुडघ्याला वाशिंगफ बांधत ॲक्टिव्ह मोडवर आहेत. दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा संकेत असून, त्यातील पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे या निवडणुकांचे बिगुल दीपावलीनंतर वाजण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे २०२५ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले असले तरी आयोगाकडे आवश्यक साधनसामग्री आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे निवडणुकांच्या तयारीसाठी अधिक वेळ आवश्यक आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये आयोग सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीसाठी अंतरिम अर्ज दाखल करणार आहे. ही सर्व प्रक्रिया लक्षात घेता, निवडणुकीचे बिगुल दीपावलीनंतरच वाजणार असल्याची दाट शक्यता आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ६३ गट आणि पंचायत समित्यांच्या १२६ गणांमध्ये इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच जोरदार हालचाली सुरू केल्या असून, मगुडघ्याला बाशिंगफबांधून प्रचाराच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. २३९६ मतदान केंद्रांची एकूण संख्या दरम्यान, जिल्ह्यातील आगामी जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांची संख्या १८ लाख ७० हजार ५८७ इतकी असून, यंदा मतदान केंद्रांची एकूण संख्या २३९६ इतकी असणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तब्बल ४३६ मतदान केंद्रांची भर पडणार मतदार ठेवता येणार नसल्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे. आहे. एका केंद्रावर ९०० पेक्षा अधिक
कन्नड तालुक्यात सर्वाधिक ७९ मतदान केंद्रांची भर पडली असून, त्यापाठोपाठ गंगापूरमध्ये ७७, वैजापूर ६९, फुलंब्री ५०, पैठण ४१, सोयगाव ३५, छत्रपती संभाजीनगर ३०, खुलताबाद २८ आणि सिल्लोड तालुक्यात २७ नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत.
साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असून, प्रशासकराज आहे. त्यामुळे त्या-त्या मतदारसंघातील अगोदर असलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजकीय वजन कमी झाले. तेथील राजकीय समीकरणेही बदलून गेल्यामुळे प्रस्थापितांचा पुन्हा नव्याने तेथे जम बसविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्का बसणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. दिवाळीनंतर निवडणूक होणार असल्याने कार्यकर्त्यांची मर्जी आत्तापासूनच सांभाळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दिवाळीत खिसा रिकामा करावा लागणार आहे.