

Vaijapur Shrirampur road accident
वैजापूर : तालुक्यातील वैजापूर-श्रीरामपूर रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. हायवा आणि दुचाकीचा झालेल्या या अपघातात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आई गंभीर जखमी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जखमी महिलेला तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे