Chhatrapati Sambhajinagar-होर्डिंगमुक्त घोषणानंतरही शहरात अनधिकृत फलकांचा सुळसुळाट

Unauthorized hoardings in Chhatrapati Sambhajinagar- सिडको उड्डाणपुलावर कोसळली होर्डिंगची फ्रेम : दुचाकीस्वार गंभीर जखमी
Chhatrapati Sambhajinagar
याच पोलवर लटकविलेला होर्डिंग अचानक दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.Pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील बेकायदा होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐरणीवर आला आहे. सिडको उड्डाणपुलावर मंगळवारी (दि.२७) दुपारी दुचाकीसमोर होर्डिंगची फ्रेम कोसळल्याने एक जण गंभीर जखमी झाला. सुदैवाने मागून येणाऱ्या वाहनांमुळे मोठी दुर्घटना टळली. काही महिन्यांपूर्वी अनधिकृत होर्डिंग हटविताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतरही शहरातील परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसल्याने आणखी किती जणांच्या जीवावर बेतल्यानंतर प्रशासन ठोस पावले उचलणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि पथदिव्यांच्या खांबांवर वाढदिवस, विविध कार्यक्रम तसेच राजकीय नेत्यांचे अभिनंदन करणारे फलक पुन्हा दिसू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या या होर्डिंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासह अपघाताचा धोकाही वाढत आहे.

दरम्यान, शहर होर्डिंगमुक्त करण्याचा निर्णय महापौर समीर राजूरकर यांनी घेतला. त्यानंतर महापालिकेने अनधिकृत होर्डिंगविरोधात मोहीम सुरू केली होती. संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, सुरुवातीच्या कारवाईनंतर मोहिमेचा वेग मंदावल्याने पुन्हा बेकायदा होर्डिंग उभारले जात असल्याचे चित्र आहे. शहरात जागोजागी लावण्यात आलेल्या एका होर्डिंगची फ्रेम मंगळवारी दुपारी सिडको उड्डाणपुलावरून दुचाकीने जात असलेल्या व्यक्तीसमोर अचानक कोसळली. या प्रकारामुळे दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली.

त्याचवेळी मागून भरधाव वेगाने वाहने येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता होती. वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेने सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या अनधिकृत होर्डिंगच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे.

दरम्यान होर्डीगचे फ्रेम कोसळल्याने दुचाकीस्वाराच्या पायाचे हाड मोडले. शहरात जागोजागी विजेच्या पथदिव्यांच्या खांबावर विविध प्रकारचे बॅनर्स, होर्डिंग धोकादायकपणे लावण्यात येत आहे. उड्डाणपुलावर किंवा रस्त्यांवर होर्डिंगची फ्रेम कोसळल्याच्या अनेक गंभीर घटना शहरात घडल्या आहेत. अनधिकृत होर्डिंगमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. परंतु याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील बेकायदा होर्डिंगवर नियमित कारवाई करण्याचे आदेश वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. या प्रकरणाचा पुन्हा आढावा घेऊन अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई केली जाईल.

- संतोष वाहुळे संनियंत्रण अधिकारी.

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar water crisis| जिल्ह्यातील १४२ गाव, वाड्यांना १७० टँकरद्वारे पाणी

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही परिस्थिती जैसे थे

मुकुंदवाडी परिसरात मंदिरावरील बेकायदा होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरू असताना विजेचा धक्का लागून महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला होता. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईचा धडाका लावला. मात्र, कारवाईत सातत्य न राहिल्याने पुन्हा शहरात होर्डिंग उभारण्याचे प्रकार वाढले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar accident: वेरूळ (माटेगाव) चौफुलीवर भरधाव ईको कारची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news