Jewellery Theft in Temple: मंदिरातील गर्दीचा फायदा घेत १.०५ लाखांचे मंगळसूत्र लंपास

मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांच्या हालचाली आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे
Gold Theft
Gold TheftFile Photo
Published on
Updated on

वेरूळ: वेरूळ येथील प्रसिद्ध श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाच्या गळ्यातील सुमारे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत लंपास करण्यात आल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी घडली. दर्शनाच्या रांगेत ही चोरी झाल्याचे समोर आले. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली करणारी एक महिला, तिची मुलगी आणि एक पुरुष आढळून आले आहेत. या संशयितांचा शोध घेण्यासाठी खुलताबाद पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

Gold Theft
Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी सारीका अमोल गपाट (वय ३७) या २९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता पती, मुले आणि भावाच्या कुटुंबीयांसह घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती.

Gold Theft
Chhatrapati Sambhajinagar politics : फुलंब्रीत भाजप, काँग्रेस, उबाठाला खिंडार

दर्शनासाठी रांगेतून पुढे जात असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळील पायऱ्या चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ परिसरात तसेच आजूबाजूला मंगळसूत्राचा शोध घेतला; मात्र ते मिळून आले नाही. गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने मंगळसूत्र लंपास केल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

Gold Theft
Chhatrapati Sambhajinagar News : मनपाच्या १०० बालवाडी शिक्षिकांना मुदतवाढीचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा

घटनेची माहिती मिळताच मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री तसेच सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांच्या मदतीने फुटेजची पाहणी करण्यात आली. फुटेजमध्ये दुपारी सुमारे २.१० वाजण्याच्या सुमारास एक महिला, तिची मुलगी आणि एक पुरुष संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्याने या तिघांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Gold Theft
Chhatrapati Sambhajinagar CBG Project : कचऱ्यापासून गॅस निर्मितीला बीपीसीएलची तयारी; दररोज २०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया

सात ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र

चोरीस गेलेल्या मंगळसूत्राचे वजन सुमारे सात ग्रॅम असून त्याची किंमत अंदाजे १ लाख ५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सारीका अमोल गपाट यांच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांच्या हालचाली आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ.मनोहर पुंगळे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news