Chhatrapati Sambhajinagar crime : तलवार घेऊन दहशत माजवणारा सातारा पोलिसांच्या जाळ्यात

चौकशीत बकऱ्यांच्या खुराड्यामध्ये लपविलेला गांजाचा साठा जप्त
Sambhajinagar Crime News
तलवारीसह गांजा जप्त करून आरोपीला अटक करणारे पोलिस पथक, खाली बसलेला आरोपी.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटकेनंतर चौकशीत आर-ोपीने चक्क बकरीच्या खुराड्यात जमिनीखाली गांजा लपवून ठेवल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला जेरबंद केले आहे.

सोनुसिंग दिपकसिंग भोंड (३०, रा. कांचनवाडी, कश्मीरनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. सोमवारी (दि. १६) सातारा ठाण्याचे पथक कांचनवाडी परिसरातील काश्मीरनगर भागात फरार आरोपींचा शोध घेत होते. यावेळी सोनुसिंग भोंड हातात धारदार तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सोनुसिंगला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून तलवार व मोबाईल जप्त केला.

Sambhajinagar Crime News
Fake gold fraud case : बनावट सोन्यावर बारा लाखांचा डल्ला!

पोलीस पथकाने फॉरेन्सिक तज्ज्ञांसह आरोपीच्या घरी छापा टाकला. चौकशीत जमिनीखाली गाडलेल्या प्लास्टिक कॅनमधून पोलिसांनी १ किलो २०९ ग्रॅम गांजाही जप्त केला. ही कारवाई सपोनि शैलेश देशमुख, उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, दिलीप बचाटे, नंदकुमार भंडारे, अंमलदार दिगंबर राठोड, सुनील बेलकर, सचिन काळे, सुरेश काळे, कल्याण निकम, विशाखा तुपे आणि गीता ढाकणे यांनी केली.

आरोपी सोनुसिंग याचे वडील कुख्यात गुन्हेगार होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. भाऊ देखील गुन्हेगार आहे. सोनुसिंग विरुद्ध लातूर येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sambhajinagar Crime News
Helicopter pre wedding shoot : प्री वेडींगसाठी अनेकांना हवे हेलिकॉप्टर

सुरुवातीला केवळ शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला. त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगमध्ये गांजा खरेदी-विक्रीचे पुरावे आढळून आले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या बकऱ्यांच्या खुराड्यात जमिनीखाली गांजा पुरून ठेवल्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news