Chhatrapati Sambhajinagar Crime : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीस भर रस्त्यात मारहाण

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : प्रेमास नकार दिल्याच्या रागातून १७वर्षीय विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या तरुणाने भररस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करित मारहाण केली. तसेच तिच्यासह तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २० ऑक्टोबर २०२४ ते २५ जुलै २०२६ दरम्यान घडला. रोहन गायकवाड (२१, रा. भीमपुरा, उस्मानुपरा) असे मजनूचे नाव असून, त्याच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ वर्षीय पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले की सध्या ती बारावीचे शिक्षण घेत आहे. दहावीत शिकत असताना वर्गातील मित्राच्या माध्यमातून तिची रोहन गायकवाड पीडितेने एका याच्याशी ओळख झाली होती.

Crime News
Sambhajinagar Municipal Corporation : २११२ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार

ओळखीतून रोहनने पीडितेकडून मैत्रीच्या नात्याने इन्स्टा आयडी घेतली. त्यानंतर काही दिवस सोशल मीडियावर दोघांचे बोलणे सुरू होते. मात्र, ही बाब पीडितेच्या पालकांना समजली आणि त्यांनी रोहन सोबत न बोलण्याची सक्त ताकीद दिली, त्यामुळे पीडितेने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर, महाविद्यालयात प्रवेश घेतला, ही बाब रोहन गायकवाडला माहिती झाली.

तेव्हापासून तो वारंवार महाविद्यालय परिसरात येऊन मला तुझ्याशी बोलायचे आहे, तुझा मोबाइल नंबर दे असे म्हणून पाठलाग करू लागला. दररोजच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर त्याला मोबाइल नंबर दिला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून रोहन विरुद्ध उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
Beed teacher recruitment scam : बोगस शिक्षक भरती प्रकरणाला नवे वळण; पुराव्यासह दिलेल्या तक्रारीच 'गहाळ'?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news