Sambhajinagar son kills father - चित्रपट संपला अन् बापाचा खेळ खल्लास! जेवणात मीठ कमी पडल्याने मुलानेच घेतला पित्याचा बळी

Sambhajinagar son kills father over salt argument -
Sambhajinagar son kills father - चित्रपट संपला अन् बापाचा खेळ खल्लास! जेवणात मीठ कमी पडल्याने मुलानेच घेतला पित्याचा बळी
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : आईचे छत्र हरपल्यानंतर स्वतः एका हाताने संसाराचा गाडा हाकत आणि स्वयंपाक करून मुलांना मोठे करणाऱ्या जन्मदात्या पित्याची पोटच्याच मुलाने क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंपाकामध्ये मीठ कमी-जास्त झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद घालत, मुलाने वडिलांचे डोके भिंतीवर आपटून आणि गळा दाबून त्यांचा खून केला. ही घटना रविवार (दि. १५) रोजी रात्री हमालवाडा परिसरात घडली.

Sambhajinagar son kills father - चित्रपट संपला अन् बापाचा खेळ खल्लास! जेवणात मीठ कमी पडल्याने मुलानेच घेतला पित्याचा बळी
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली

साहेबराव म्हस्के असे मृत पित्याचे नाव असून, याप्रकरणी त्यांचा लहान मुलगा कैलास साहेबराव म्हस्के (वय ३३, रा. गल्ली क्र. ५, हमालवाडा रेल्वे स्टेशन) याच्यावर सातारा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

Sambhajinagar son kills father - चित्रपट संपला अन् बापाचा खेळ खल्लास! जेवणात मीठ कमी पडल्याने मुलानेच घेतला पित्याचा बळी
Sambhajinagar News : विकसित छत्रपती संभाजीनगर २०४७ साठी मनपाची 'मित्र' सोबत भागीदारी

मृत साहेबराव यांचा दुसरा मुलगा विलास म्हस्के (३८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, साहेबराव यांच्या पत्नीचे मुलांच्या लहानपणीच निधन झाले होते. दुर्दैवाने, साहेबराव यांना पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांचा एक हात निकामी झाला होता. असे असतानाही त्यांनी उमेश, विलास आणि कैलास या तीनही मुलांचे खस्ता खात संगोपन केले. मोठा मुलगा उमेश कुटुंबासह इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतो, तर विलास आणि कैलास हे साहेबराव यांच्यासोबतच राहात होते. विलासची पत्नी त्याला सोडून गेली आहे, तर कैलास कोणताही रोजगार न करता नुसता उनाडक्या करत होता. या दोघांचीही जबाबदारी साहेबराव यांच्यावरच होती आणि ते एका हाताने स्वयंपाक करून त्यांना जेऊ घालत होते.

साहेबराव एका हाताने करत असतानाही आरोपी कैलास नेहमी त्यांच्याशी वाद घालत असे. कधी जेवणात मीठ कमी, तर कधी तिखट जास्त झाल्याच्या कारणावरून तो वडिलांना वारंवार त्रास देत असे. १४ नोव्हेंबरच्या रात्रीही याच कारणावरून बापलेकात वाद झाल्याचे समोर आले आहे,

१४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता विलास घरी आले तेव्हा साहेबराव आणि कैलास टीव्हीवर चित्रपट पाहत होते. रात्री नऊच्या सुमारास चित्रपट संपल्यावर विलास वडिलांसाठी बिस्किटे आणून बाहेर तंबाखू खाण्यासाठी गेले. अवघ्या १०-१५ मिनिटांतच कैलास तेथे घाबरलेल्या अवस्थेत आला आणि त्याने 'वडिलांनी मारहाण व शिवीगाळ केली' असा बनाव करत गळ्यावरील जखम दाखवून तिथून पळ काढला. विलास घरी परतले तेव्हा साहेबराव मागील खोलीत उताणे पडलेले दिसले. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने नातेवाईकांना बोलावून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदनात (पोस्टमार्टम) साहेबराव यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचे, तसेच नाक आणि तोंड दाबून श्वास रोखल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

हत्येनंतर आसरा शोधण्याचा प्रयत्न

वडिलांची हत्या केल्यानंतर कैलास घराबाहेर पडला होता. त्याने परिस-रातील काहींकडे पाणी मागितले आणि एका दिवसासाठी झोपायला आसरा देण्याची विनंती केली. ही माहिती मिळताच विलास यांचा कैलासवरील संशय बळावला. अखेर विलास यांच्या फिर्यादीवरून कैलासवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक मारुती खिल्लारे करत आहेत.