Chhatrapati Sambhajinagar|शिवना नदीपात्रातील वाळू उपशाच्या वादातून सनवमध्ये हाणामारी; एकाचा मृत्यू

sand mining dispute attack- डोक्यात हत्याराने वार; एक गंभीर जखमी, पहाटेची घटना; हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना
Chhatrapati Sambhajinagar
sand mining dispute attack
Published on: 
Updated on: 

गंगापूर : शिवना नदीपात्रातील वाळू उपशाच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने रियाज पठाण (रा. सनव) यांचा मृत्यू झाला. तर अशद सत्तार शेख (रा. सनव) हे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास सनव येथील शिवना नदीपात्रात घडली. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Knife attack : तडीपार गुंडाचा फुकट पाणीपुरी खाऊन विक्रेत्यावर चाकूहल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, शिवना नदीपात्रात जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा करून डंपरमध्ये भरण्याचे काम सुरू असताना रियाज पठाण व अशद शेख हे नदीपात्रात गेले होते. यावेळी दोन गटांत वाद झाल्यानंतर हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात रियाज पठाण यांच्या डोक्यात अज्ञात हत्याराने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अशद शेख यांनाही मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यातील दुसऱ्या गटातील एक जणही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, चार ते पाच दिवसांपूर्वी रियाज यांचे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडल्याचे सांगण्यात येते. तसेच रात्रीच्या वेळी समोरील गटाच्या वाहनाबाबत पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांत वाद सुरू असल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Wastage of water : पाण्याचा अपव्यय; मनपाचा कारवाईचा बडगा

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी जान्हवी शेखर आणि शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी जान्हवी शेखर यांनी दिली.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर सनव परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news