

छत्रपती संभाजीनगर : प्राण्यांच्या अदलाबदलीमध्ये गतवर्षी कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाने सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाला पांढऱ्या वाघाच्या जोडीच्या बदल्यात सिंहाची जोडी दिली. परंतु तरुण वाघ घेऊन सिंहाची वृद्ध जोडी दिली. एवढेच नव्हे तर सिंहिण सुचित्रा दीर्घकालीन फुफ्फुसाच्या आजाराने पीडित असल्याची माहितीही दिली नसल्याचा संताप सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाच्या पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नीती सिंग यांनी गुरुवारी (दि. ९) शवविच्छेदन अहवालाची माहिती देताना सांगितले.
शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पांढऱ्या वाघांच्या जोडीची मागणी नोंदविली होती. त्यावरून छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाकडे अतिरिक्त वाघ असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून सिद्धार्थ उद्यानाने शिवमोग्गाकडे सिंहाच्या जोडीची मागणी केली.
प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राण्यांच्या अदलाबदलाला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर दोन्ही प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी प्राणी पाहून अदलाबदलास सहमती दर्शविल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीत प्राणी देवणाघेवाणची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात सिंहाच्या जोडीसोबतच महापालिकेला अस्वल आणि कोल्ह्याची जोडीही मिळाली होती. मात्र सिंहाची जोडी मिळाली त्यात ८ वर्षांचा अर्जुन आणि १० वर्षांची सुचित्रा नामक सिंहिणीचा समावेश होता.
दरम्यान, सिंह, वाघ आणि चिता यांचे साधारणतः १७ ते १८ वर्षे आयुष्य असते. बंधिस्त प्राण्यांचे आयुष्य हे १४ ते १५ वर्षे असते, असे प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीती सिंह यांनी सांगितले. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला प्राप्त झालेल्या सुचित्रा नामक सिहिंण ही त्यावेळी १२ वर्षे काही महिने असे तिचे वय होते. तेथून आणल्यानंतर ९ महिनेच ती जगू शकली. गेल्या चार-पाच दिवसांपासून ती आजारी होती. खानपान सोडले होते. त्यामुळे तिच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यात ब्रॉको निमोनियाचे निदान झाले. हा आजार दीर्घकालीन फुफ्फुसाच्या इन्फेक्शनमुळे होतो. या सिहिणीला शिवमोग्गा येथूनच काही इन्फेक्शन झाले असावे, असे म्हणत डॉ. सिंग यांनी संताप व्यक्त केला.
फुफ्फुस पूर्णपणे निकामी
सिहिंण सुचित्राला दीर्घकालीन फुफ्फुसाचा आजार असेल. त्यामुळेच तिचे फुफ्फुस पूर्णतः निकामी झाले होते. हा प्रकार दीर्घकालीन आजाराने होतो. वृद्धपाळामुळे सर्वच अवयवांना त्यामुळे हनी पोहोचली, असेही डॉ. नीती सिंह यांनी सांगितले.
आता सिहिंणीची प्रतीक्षा
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील सिंहाची जोडी मरण पावल्यानंतर तब्बल १४ वर्षांनी नवीन जोडी प्राप्त झाली होती. परंतु त्यातील सिहिण ९ महिन्यांतच दगावल्याने आता सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला नव्या तरुण सिहिणीची प्रतीक्षा आहे. वाघांच्या जन्मासाठी पोषक ठरणारे सिद्धार्थ उद्यान सिंहासाठीही पोषक ठरले असते