३२ वर्षांपूर्वीचे ९५ प्लॉट परस्पर विकले; एमआयएम नगरसेवकासह १३ जणांवर गुन्हा

95 Plots Fraud Case-चिकलठाण्यातील महाघोटाळा: मध्यरात्री जेसीबी लावून जमीन बळकावण्याचा प्रयत्न अंगलट
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील गट नंबर ६३० मध्ये तब्बल ३२ वर्षांपूर्वी रीतसर खरेदी केलेले ९५ प्लॉट मूळ मालकाच्या वारसदारांनी संगनमत करून चक्क एमआयएमच्या नगरसेवकासह पाच जणांना परस्पर विकल्याचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात एमआयएमचे नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्यासह जमीन विकणारे ८ वारसदार आणि खरेदी करणारे ५ अशा एकूण १३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी देवीदास विठ्ठलराव पाटेकर (६३, रा. तुर्काबाद खराडी, ता. गंगापूर) यांच्या तक्रारीनुसार, पाटेकर यांच्यासह हकीम फाजलखान पठाण, बाळासाहेब खरात, विनायक महेंद्रकर आदी तब्बल ९५ नागरिकांनी १९९२ च्या सुमारास मूळ मालक काशीनाथ लहानुजी मगर यांच्याकडून रोख पैसे देऊन रीतसर खरेदीखताने (रजिस्ट्री) प्लॉट घेतले होते. या सर्व प्लॉटवर नागरिकांनी तार कंपाऊंड करून स्वतःच्या मालकीचे बोर्ड लावले होते, तर काहींनी सातबारावर नोंदीही घेतल्या होत्या.

मूळ मालक काशीनाथ मगर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठ वारसदारांना या प्लॉट विक्रीची पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांनी संगनमत करून ६ मार्च २०२६ रोजी संपूर्ण गट अ नं. ६३० (क्षेत्र ७६.५३ आर) जमिनीचे परस्पर खरेदीखत करून ती नगरसेवक काकडे व इतर चौघांना विकली.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar|अब्जावधीचे भूखंड होणार मनपाच्या नावे

या नवीन खरेदीखताच्या आधारे २८ जून रोजी रात्री ८ च्या सुमारास मन्सूर पठाण व इतरांनी प्लॉटवर जेसीबी (एमएच २१, बीव्ही १०३१) आणून सपाटीकरण सुरू केले. नि प्लॉटधारकांनी मारलेले तार कंपाऊंड आणि बोर्ड तोडून नुकसान करण्यात आले. यावेळी तेथून जाणारे हकीम पठाण यांनी जेसीबी चालकाला रोखले असता, मन्सूर पठाण याने 'आम्ही ही जमीन मगर यांच्या वारसांकडून विकत घेतली आहे', असे सांगत नवीन खरेदीखत दाखवले.

Crime News
Umrah Tour Fraud | तुर्की, उमराहच्या दर्शनाचे आमिष दाखवून भाविकांना घातला तब्बल १० लाखांचा गंडा

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटेकर व इतर प्लॉटधारकांनी थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाचोळे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news