Chhatrapati Sambhajinagar RTO : ऑटोचालकांच्या ज्ञानाची परीक्षा; ७७ जणांना नोटीस

पाच दिवसांत ६८४ रिक्षा, कॅब चालकांची तपासणी; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
Chhatrapati Sambhajinagar RTO
Chhatrapati Sambhajinagar RTOpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या वाहनचालकांविरोधात आरटीओ कार्यालयाच्या वतीने तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. २० ते २४ ऑगस्टदरम्यान विविध ठिकाणी सुमारे ६८४ रिक्षासह कॅब चालकांच्या तपासणीत सुमारे ७७ ऑटोसह कॅबचालकांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळून आले. संबंधित ७७ वाहनचालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

आरटीओ कार्यालयाच्या वतीने अमराठी रिक्षा, कॅबचालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी करण्यात येत आहे. ही मोहीम २० ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. २० ऑगस्ट रोजीद्य- २१६, २१ ऑगस्ट- १३१, २२ ऑगस्ट-१२१, २३ ऑगस्ट- १०६ आणि २४ ऑगस्टला ११० ऑटोसह कॅब तपासण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar RTO
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : नगरसेवक अपात्रतेप्रकरणी दुसऱ्या टप्प्यात ९ प्रकरणांची सुनावणी

तपासणीदरम्यान २० ऑगस्टला २१, २१ ऑगस्टला १५, २२ ऑगस्टला १५, २३ ऑगस्टला १४ आणि २४ ऑगस्टला १२ चालकांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळले. या सर्व ७७ चालकांना नोटीस जारी करण्यात आली. मात्र, या कालावधीत कोणत्याही वाहनचालकावर परवाना निलंबितची कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

महिन्यानंतर कारवाईची शक्यता

तपासणी मोहिमेत ७७चालकांना मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळून आले. यांना एक महिन्यात मराठीचे जुजबी ज्ञान घेऊन प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. पुढील टप्प्यात या चालकांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर मात्र परवाना निलंबित किंवा इतर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar RTO
kunal chandgude case: चांदगुडे कुटुंबासोबतच दरीत कोसळले मृत्यूचे सत्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news