Sambhajinagar Rickshaw Strike : रिक्षा बंदमुळे शहर अन् वाळूजचा प्रवास ठप्प; २५ हजार रिक्षांची चाके थांबली

बाईक टॅक्सीविरोधात राज्यव्यापी आंदोलन; नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांची पायपीट
Sambhajinagar Rickshaw Strike
रिक्षा बंदमुळे सोमवारी नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी पायपीट झाली. या बंदमध्ये अनेक रिक्षा संघटना सहभागी नव्हत्या, त्यामुळे सकाळी काही रिक्षा रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, आंदोलकांकडून रिक्षा अडवून प्रवाशांना उतरवण्याचे प्रकार घडल्याने अप्रिय घटनेच्या भीतीपोटी इतर चालकांनीही रिक्षा जागेवरच उभ्या केल्या. परिणामी दिवसभर प्रवाशांचे हाल झालेpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर / वाळूज महानगर : विनापरवाना बाईक टॅक्सीला विरोध व इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि. २३) रिक्षा पंचायतीने राज्यव्यापी रिक्षा बंद आंदोलन पुकारले होते. यामुळे शहर आणि वाळूज परिसरातील सुमारे २५ हजार रिक्षांची चाके जागेवरच थांबल्याने सकाळपासूनच कामगार, नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागली. काही रिक्षाचालकांचा या बंदला विरोध होता; तरीही अप्रिय घटना घडण्याच्या आशंकेने तेही रस्त्यावर आले नसल्याने दिवसभर रिक्षांचा शुकशुकाट दिसून आला.

सोमवारी महाराष्ट्रातील विविध रिक्षा संघटनांच्या वतीने राज्यव्यापी एकदिवसीय रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा पंचायतचे बाबा कांबळे यांनी शहरातील विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. बाईक टॅक्सीच्या विरोधात ठोस कारवाई व्हावी, ऑनलाईन पावत्या रद्द कराव्यात, आरटीओच्या कामांचे खासगीकरण रद्द करावे, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Sambhajinagar Rickshaw Strike
100th Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ.लिंबाळे यांचे नाव आघाडीवर?

विविध रिक्षा संघटनांनी सोमवारच्या रिक्षा बंदमध्ये सहभाग नोंदवला होता. या संघटनांनी बाबा पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालयांवर रिक्षांचा मार्च काढत जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय नाही घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

रिक्षांचा बंद असल्याची माहिती सर्वसामांन्य नागरिकांना नव्हती. दरम्यान सकाळी ते आपापल्या कामांवर जाण्यासाठी रिक्षांची वाट पाहत असतांना त्यांना रिक्षांचा बंद असल्याची माहिती मिळाली. ऐनवेळी कामांचे ठिकाणी जवळ करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. याच प्रमाण शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांना सोडण्यासाठी पालकांनाच जावे लागले तर बाहेर गावांहून शहरात आलेल्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणांत पायपीट करावी लागली.

दरम्यान, वाळूज महानगरात रिक्षा चालकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवत सोमवारी सायंकाळपर्यंत रिक्षा बंद ठेवल्या होत्या. शहरासह परिसरातील अनेक गावांमधील शेकडो कामगार दुचाकीने तर काही रिक्षाने वाळूज औद्योगिक क्षेत्रात कामासाठी येतात. या भागात रिक्षा बंद असल्याने बजाजनगर येथील मोरे चौक, पंढरपूर येथील तिरंगा चौक तसेच रांजणगाव येथील बस थांब्यावर अनेक जण वाहनाच्या प्रतीक्षेत उभे असलेले दिसून आले.

Sambhajinagar Rickshaw Strike
Latur Crime : पोलिस ठाण्यातच युवकाने जीवन संपवले

या आहेत मागण्या

  • अॅप-आधारित टॅक्सी, बाईक टॅक्सीला विरोध

  • ट्रकचालकांना सुरक्षा आणि सोयीसुविधा द्या

  • वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या जाचक कारवाईपासून संरक्षण मिळावे

  • मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदा करा

  • ऑनलाइन चलन, टोल टॅक्सचा बोजा नको

  • खासगी फिटनेस सेंटर आणि आरटीओ कार्यालयाचे खासगीकरण रद्द करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.