

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून 133 वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया स्थगित केल्यानंतर त्रुटीपूर्ततेची संधी देण्यात आली होती. परंतु, चार जिल्ह्यांतून एकूण 56 महाविद्यालयांनी आवश्यक निकषांची पूर्तता न केल्याने त्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश नाकारण्यात आले आहेत. यात अनेक बड्या महाविद्यालयाचा समावेश असल्याची माहिती प्र. कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महाविद्यालयांपैकी, यापूर्वी कोहिनूर महाविद्यालयाचे प्रवेश स्थगित केले होते. तसेच, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला संलग्न झाल्यामुळे त्यांचा समावेश या यादीत नाही.
75 महाविद्यालयांनी त्रुटीपूर्तता सादर केली, परंतु 34 महाविद्यालयांवर प्रवेश स्थगितीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. एकूण 189 पदव्युत्तर महाविद्यालयांपैकी 113 महाविद्यालयांचे प्रवेश आधीच रोखण्यात आले होते. यापैकी 65 महाविद्यालयांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर तपासणी करून 57 महाविद्यालयांना प्रवेश मान्यता देण्यात आली. यामुळे विद्यापीठाकडून मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांची संख्या 76 वरून वाढून 133 झाली आहे. परंतु, 56 महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. या जवळपास 3 हजार 390 प्रवेशांवर स्थगिती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा फरक पडण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाकडून त्रुटीपूर्तता पूर्ण न करणार्या महाविद्यालयांना कठोर कारवाईची सूचना देण्यात आली असून, पुढील सूचना येईपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले