Illegal Liquor Seized : पिशोर पोलिसांची धडक कारवाई; रू. २.२४ लाखांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

Chhatrapati Sambhajinagar : चिंचोली लिंबाजी येथे घरावर छापा; एकाविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
Illegal Liquor Seized : पिशोर पोलिसांची धडक कारवाई; रू. २.२४ लाखांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त
Published on
Updated on

पिशोर : पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चिंचोली लिंबाजी येथे धडक कारवाई केली. अवैधरित्या साठवून ठेवलेला २लाख २४ हजार ८० किमतीचा देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Liquor Seized : पिशोर पोलिसांची धडक कारवाई; रू. २.२४ लाखांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त
Chhatrapati Sambhajinagar rain : मुसळधार पावसाने खेळणा धरण ३० टक्क्यांवर

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विनोदकुमार रामगोपाल जैस्वाल (वय ४८, रा. चिंचोली ली., ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान कोणताही वैध परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीररीत्या ठेवलेला आढळून आला. कारवाईदरम्यान विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्यांसह एकूण ₹२,२४,०८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Illegal Liquor Seized : पिशोर पोलिसांची धडक कारवाई; रू. २.२४ लाखांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त
Chhatrapati Sambhajinagar : लंगडा तांड्यात पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांची जीवघेणी वाटचाल

याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना फेरोज बर्डे करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री (कन्नड उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, स.फौ.गजानन कराळे, पोना फेरोज बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कव्वाल, पवन खंबाट, कौतिक सपकाळ, विजय भोटकर, मपोशी कल्याणी देवरे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोहेकॉ अमोल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल मयूर वाळुंजकर, घुगे, प्रमोद सोनवणे यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news