Illegal Liquor Seized | अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यावर पिशोर पोलिसांचा छापा; ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त

वाकोद फाट्यावर कारवाई; १९२ देशी दारूच्या बाटल्यांसह दुचाकी जप्त
Pishor Police Raid
Pishor Police RaidPudhari
Published on: 
Updated on: 

Pishor Police Raid

पिशोर : पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत ९५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास वाकोद फाटा येथे करण्यात आली.

या कारवाईत अंकुश गणपत भागवत (वय ३७, रा. डोईफोडा, ता. सिल्लोड) हा विनापरवाना देशी दारू बाळगून तिची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून संजीवनी संत्रा कंपनीच्या १८० मिलीच्या एकूण १९२ बाटल्या तसेच हिरो होंडा एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्र. एमएच २० एफएन ४२९०) असा एकूण ९५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) व ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pishor Police Raid
Chhatrapati Sambhajinagar Theft : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; ३ घरफोड्यांत लाखोंचा ऐवज लंपास

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक सतीश बरडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कवाल, कौतिक सपकाळ, पवन खंबाट व मच्छिंद्र देवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री, वाहतूक तसेच इतर अवैध धंद्यांविरुद्ध यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.