Illegal liquor seized : पिशोर पोलिसांची अवैध दारूविरुद्ध कारवाई; ११ हजार ५२० रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 Illegal Liquor Seized
Illegal Liquor SeizedPudhari
Published on
Updated on

पिशोर : पिशोर पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारू विक्रीच्या उद्देशाने साठा बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध पिशोर पोलिसांनी कारवाई करत ११ हजार ५२० रुपये किमतीचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त केला. ४ सप्टेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता पिशोर नाका येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वर रामदास सुरडकर (वय ४४, रा. डिगर, पिशोर.) याच्या ताब्यात देशी दारूचा साठा आढळून आला.

 Illegal Liquor Seized
Illegal liquor seized : पिशोर पोलिसांची अवैध दारूविरुद्ध कारवाई; ११ हजार ५२० रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी त्याच्याकडून ‘संजिवनी संत्रा’ असे कागदी लेबल असलेल्या १८० एम.एल. क्षमतेच्या एकूण ९६ सीलबंद काचेच्या बाटल्या जप्त केल्या. प्रत्येक बाटलीची विक्री किंमत १२० रुपये असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ११,५२० रुपये आहे. या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. डी. आर. लोखंडे करीत आहेत.

 Illegal Liquor Seized
Chincholi Illegal Liquor Sale: चिंचोलीत अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; कारवाई न झाल्यास महिलांचे बेमुदत उपोषण

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री (कन्नड उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोह.परमेश्वर दराडे, पोहेकॉ.दत्ता लोखंडे, पो.कॉ. गणेश कव्वाल, पो.कॉ. अन्सार पटेल व पोका.करण म्हस्के यांनी सहभाग घेतला. पिशोर पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारूची विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर व प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news