Paithan Robbery | पैठणमध्ये चोरीचे सत्र कायम; शहागड फाट्यावर दुकान फोडून आठ लाखांचा मुद्देमाल लंपास

चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Shop Looted Paithan
सागर मशिनरी दुकानाचे चोरट्यांनी उचकटून टाकलेले शटर Pudhari
Published on
Updated on

Shop Looted Paithan

पैठण: पैठण-शेवगाव रोडवरील चोरी आणि लुटमारच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (दि.१) रात्री शहागड फाट्यावर आणखी एक घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी सागर मशिनरी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे तसेच विद्युत मोटर साहित्य असा मिळून तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

यापूर्वीही या मार्गावर लुटमारच्या घटना घडल्या आहेत. श्रावण महिन्यात देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविक दांपत्याची पाटेगाव येथे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांच्या मदतीने इराणी टोळीतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, त्याच टोळीतील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Shop Looted Paithan
Paithan News | पैठण तालुक्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, पाच जणांना अटक; ३० लाखांचे ट्रॅक्टर जप्त

या घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खाडे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या सलग घडणाऱ्या चोरी आणि लुटमार प्रकरणांमुळे पैठण-शेवगाव रोड परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना गजाआड करण्याची मागणी जोर धरत आहे.

Shop Looted Paithan
Devendra Fadnavis| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १९ रोजी पैठण तालुक्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news