छत्रपती संभाजी नगर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे मंगळवारपासून छत्रपती संभाजीनगरातील हॉटेल रामा मध्ये मुक्कामी आहेत. मात्र या दौऱ्यात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांची भेट होऊ दिली जात नसल्याने महिला आघाडीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली. एरवी मतदान हवे असेल, कार्यक्रम घ्यायचे असतील तर महिला आघाडी आठवते. परंतु नेत्यांना भेटायचे असेल तर मात्र प्रमुख पदाधिकारीच भेटतात. तिथे महिला आघाडीला डावलले जाते, असा आरोप यावेळी महिला आघाडीकडून करण्यात आला.
उद्धव ठाकरे मुक्कामी थांबले आहेत, तिथे आज सकाळपासून शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी जमलेले आहेत. मात्र उद्धव ठाकरे सकाळपासून कुणालाही भेटलेले नाहीत. शिवाय पक्षाचे नेते संजय राऊत हे पक्षाच्या स्थानिक पुरुष पदाधिकाऱ्यांना भेटले. महिला आघाडीच्या नेत्यांनी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनीही महिला पदाधिकाऱ्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांचा राग अनावर झाला. त्यांनी हॉटेलमध्येच आपला संताप व्यक्त केला.
हेही वाचा :