Chatrapati Sambhajinagar : मनपाची ऑनलाईन कर भरणा यंत्रणा ठप्प

मालमत्ताधारकांत संताप, वेबसाईट बंद पडल्याने अडचण
Chhatrapati Sambhajinagar
Chatrapati Sambhajinagar : मनपाची ऑनलाईन कर भरणा यंत्रणा ठप्पFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिका मालमत्ता कराच्या थकबाकीवर प्रतिमहा २ टक्के शास्ती आकारते. त्यामुळे अनेक मालमत्ताधारक आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कर भरणा करून सवलत मिळवतात. त्यामुळे बुधवारी (दि.१) अनेक मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या अॅपवरून ऑनलाईन कर भरणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेबसाईटच बंद पडल्याने अनेकांचा हिरमोड झाला. कर भरणा करणाऱ्यांनी प्रशासनाच्या कामकाजावरच संताप व्यक्त केला.

महापालिका दरवर्षी एप्रिल, मे आणि जून अशी तीन महिने कर भरणा करणाऱ्यांना १० ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत देते. यंदाही ही सवलत कायम असल्याने त्याचा लाभ मिळावा, यासाठी अनेक मालमत्ताधारकांनी एप्रिलच्या पहिल्याच दिवशी कर भरणा करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. मात्र सवलत मिळविण्याच्या उद्देशाने केलेला हा प्रयत्न चांगलाच अडचणीचा ठरला. अनेकांनी ऑनलाईन अॅपवरून कर भरण्याचा प्रयत्न केला. मात्र सतत त्यात अडचणीत येत गेल्या. अनेकवेळा प्रयत्न करूनही वेबसाईट बंद आढळली.

Chhatrapati Sambhajinagar
Dam projects delay : धरणांची कामे रखडल्यने शासनावर कोट्यवधी बोजा वाढणार

ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्याने काहींनी बँकांमार्फत किंवा इतर पर्यायांचा अवलंब करून कर भरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातही अडचणीच आल्या. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावरच संताप व्यक्त केला. तांत्रिक कारणाने वेबसाईट बंद आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपल्याने पहिल्याच दिवशी नव्या डिमांडसह इतर काही दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्यासाठीच वेबसाईट बंद असते. त्यात ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडेनिमित्त सुटी तसेच शनिवार व रविवारची सुटी आहे, सोमवारपर्यंत (दि.६) वेबसाईट सुरू होणार असल्याचे उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले

Chhatrapati Sambhajinagar
पाईपलाईनच्या कामामुळे खडकेश्वर रोड ठप्प

वेबसाईट लवकर सुरू करण्याचे आदेश - आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेकांना अॅडव्हॉन्स टॅक्स भरणा करताना वेबसाईट बंदच्या अडचणीचा सामना करावा लागला. अनेकांच्या तक्रारी आल्याने तातडीने वेबासाईट सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news