पाईपलाईनच्या कामामुळे खडकेश्वर रोड ठप्प

संथगतीने काम, अपघाताचा वाढला धोका
sambhajinagar news
पाईपलाईनच्या कामामुळे खडकेश्वर रोड ठप्पfile photo
Published on
Updated on

Khadeshwar Road Blocked Due to Pipeline Work

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खडकेश्वर परिसरातील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे मागील दोन आठवड्यांपासून वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम केल्याने मार्ग अरुंद झाला असून, वाहतूक एकाच बाजूने वळवावी लागत आहे. परिणामी, दिवसभर या मार्गावर कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्यापासून खडकेश्वर मंदिर चौकापर्यंतचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र त्यानंतरचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेली माती, खड्डे आणि अपूर्ण काम यामुळे वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.

सकाळी व सायंकाळी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयीन वेळेत या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होते. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असून, आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होत आहेत. रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्यांना वेळेवर मार्ग मिळणे कठीण झाले आहे.

कामावर प्रश्नचिन्ह

पाईपलाईनसारखे महत्त्वाचे काम सुरू करताना वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. कामाची गती वाढवून तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news