Sambhajinagar municipal fire safety issue : महापालिकेचे प्रशासकीय सभागृहच अग्निशमन यंत्रणेविना

स्थायी समितीत प्रशासनाचा धक्कादायक खुलासा
Sambhajinagar Municipal fire safety
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporationpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिका मुख्यालयातील प्रशासकीय सभागृहातच अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ४) स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला. सभागृहात आग लागल्यास अग्निसुरक्षेची व्यवस्था काय, असा सवाल नगरसेविका माधुरी अदवंत यांनी उपस्थित केला. त्यावर अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

यंत्रणा बसविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून, पुढील महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणा बसविण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त तथा अग्निशमन विभागप्रमुख अंकुश पांढरे यांनी सभागृहाला दिली.

Sambhajinagar Municipal fire safety
Chhatrapati Sambhajinagar prison : हसूल तुरुंगाच्या भिंतीआड फुलतेय 'शिक्षणाची बाग'

सभापती अनिल मकरीये यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय सभागृहात स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता घेण्यात आली. यावेळी एमआयएमच्या नगरसेविका अलमास खानम यांनी एशियन रुग्णालयातील आगीचा मुद्दा उपस्थित करत शहरातील किती रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे, अशी विचारणा केली.

त्यानंतर भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी ज्या प्रशासकीय सभागृहात बैठक सुरू आहे, त्याच ठिकाणी आग लागल्यास अग्निसुरक्षेची काय व्यवस्था आहे? असा सवाल केला. यावर अनिशमन विभागाच्या प्रमुखांनी खुलासा करण्याचे आदेश सभापती मकरिये यांनी दिले. त्यानंतर उपायुक्त तथा अग्निशमन विभागप्रमुख अंकुश पांढरे यांनी प्रशासकीय सभागृहात सध्या अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.

Sambhajinagar Municipal fire safety
Nanded Crime : नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई

यंत्रणा बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, पुढील महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण करून अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. महत्त्वाच्या प्रशासकीय बैठका होणाऱ्या सभागृहातच अग्निशमन व्यवस्था नसल्याचे समोर आल्याने महापालिकेच्या अग्निसुरक्षेच्या तयारीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तातडीने यंत्रणा बसवणे गरजेचे

महापालिका मुख्यालयातील प्रशासकीय सभागृहात अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या नियमित बैठका होतात. अशा महत्त्वाच्या ठिकाणी अनिशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. एशियन रुग्णालयातील आगीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उपस्थित झाल्याने प्रशासनाला तातडीने यंत्रणा बसवणे गरजेचे असल्याचे मत सदस्यांनी मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news