

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यातील नकाशे आणि हद्द (व्याप्ती) यातच घोळ झाला आहे. अनेक नकाशे त्यांच्या व्याप्तीशी विसंगत आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह नागरिकही संभ्रमात असून, याबाबत अनेक जण हरकती नोंदविण्याच्या तयारीत आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत ९ जणांनी हरकती नोंदविल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रभाग रचना तयार करण्याची सूचना केली होती. त्यावरून शासनाच्या नगरविकास विभागाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना चार वॉडांचा एक प्रभाग यानुसार प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी २८ प्रभाग चार वॉर्डाचे अन् एक प्रभाग तीन वॉर्डाचा असे एकूण २९ प्रभाग तयार केले आहेत. हा आराखडा राज्य शासनाने
अपनी सभातीमगर मानगरपालिका छत्रपती संभाजीनगर निवडणूक आयोगाला सादर केला. त्यास आयोगाने मंजूरी दिल्यानंतर तो महापालिकेच्या संकेत स्थळावर २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. प्रभाग रचनेच्या या प्रारूप आराखड्यावर सूचना-हरकती घेण्यासाठी चार सप्टेबरपर्यंतची मुदत दिली आहे.
या मुदतीत सूचना-हरकती नोंदवण्यासाठी इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांकडून प्रभाग रचनेचा अभ्यास केला जात आहे. दरम्यान, या प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे आणि त्यांची व्याप्ती ही एकमेकांशी विसंगत असल्याचा प्रकार आता पुढे आला आहे. हा प्रकार अनेक प्रभागांबाबत घडला आहे. जे नकाशे तयार केले आहेत. त्यातील वसाहती या इतर प्रभागांमध्ये दाखविल्या आहेत. त्यामुळे नकाशे आणि व्याप्ती विसंगत असल्याने आपण नेमके कोणत्या प्रभागात आहोत, अशा सभ्रमावस्थेत सध्या मतदारांसह इच्छुक उमेदवार आहेत. दरम्यान, ४ सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत आहे.
पायलटबाबा नगरी हा भाग प्रभाग क्रमांक २३ च्या नकाशात दाखवण्यात आला आहे, प्रत्यक्षात हा भाग प्रभाग क्रमांक २४ मध्ये आहे. मेहरनगर प्रभाग क्रमांक २७ मध्ये दाखवण्यात आले आहे, प्रत्यक्षात ते प्रभाग क्रमांक २२ चा भाग आहे. शंभूनगर, विभागीय क्रीडा संकुल, मयूरबन कॉलनी हे भाग प्रभाग क्रमांक १९ मध्ये आहेत पण ते नकाशानुसार प्रभाग क्रमांक २० मध्ये दाखवण्यात आले आहेत.