Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation-मनपा आयुक्तांचा नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपाला लगाम

Corporators relatives interference-नातेवाईकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग : परिपत्रकाद्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाइकांकडून होत असलेल्या हस्तक्षेपाला अखेर महापालिका प्रशासनाने लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. निवडून आलेल्या अधिकृत नगरसेवक व नगरसेविकांनाच प्रशासनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागाचा अधिकार असून, त्यांच्या नातेवाइकांच्या कोणत्याही सूचना किंवा आदेशांची दखल घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश परिपत्रकाद्वारे मंगळवारी (दि.७) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये तसेच विविध विकासकामांच्या ठिकाणी काही नगरसेवकांच्या पती, पत्नी, वडील, मुले, भाऊ यांचा वाढता वावर आणि कामकाजातील हस्तक्षेप सातत्याने वाढत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. विशेषतः महिला नगरसेविकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पती किंवा इतर नातेवाइकांकडून कारभारात हस्तक्षेप होत असल्याने अधिकारी अडचणीत येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मंगळवारी परिपत्रक काढून अशा प्रकारांना स्पष्टपणे प्रतिबंध केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
मोबाईल टॉवरधारक इमारतींना व्यावसायिक कर लावा

या परिपत्रकानुसार, काही नातेवाईक स्वतःला नगरसेवक असल्याचा भास निर्माण करतात. सामाजिक माध्यमांवर स्वतःचा उल्लेख नगरसेवक म्हणून करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याच ओळखीने दूरध्वनी करणे, तसेच कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधी असल्याप्रमाणे वावरून सूचना देणे, असे प्रकार घडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

अशा कृत्यांमुळे महानगरपालिकेच्या प्रतिमेला धक्का बसत असून, संबंधित प्रकार कारवाईस पात्र असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. हे परिपत्रक सर्व नगरसेवक व नगरसेविकांनाही पाठविण्यात आले असून, कार्यालयीन शिस्त अबाधित राहावी आणि महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी आपल्या नातेवाइकांना या सूचनांची माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रशासनावरील अनधिकृत दबाव कमी होऊन कामकाज अधिक नियमबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Sambhajinagar Municipal Recruitment: मनपात २,२७३ पदे रिक्त, अतिरिक्त पदभारावरच प्रशासनाचा गाडा

सामान्य नागरिक म्हणून होणार काम

या परिपत्रकात आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले आहे की, अधिकृत नगरसेवक आणि नगरसेविकांना आवश्यक तो सन्मान दिला जाईल. मात्र त्यांच्या नातेवाइकांच्या सूचनांचे पालन करू नये किंवा त्यांच्या दबावाखाली कोणतेही नियमबाह्य काम करू नये. तथापि, हेच नातेवाईक सर्वसामान्य नागरिक म्हणून कार्यालयात आल्यास त्यांची कामे नियमानुसार आणि प्राधान्याने करण्यात यावीत, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news