

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणात जॅकवेलवर महाकाय पंपासह ३७०० अश्वशक्ती क्षमतेच्या मोटर बसवण्याच्या कामासह यांत्रिक विभागाचे सर्व काम पूर्ण झाले आहे. आता केवळ २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील ३ जोडण्यांसह जलशुद्धीकरण केंद्रात ११ ठिकाणी पाईप जोडणीचे काम शिल्लक आहे.
त्यासोबतच जलशुद्धीकरण केंद्र आणि जॅकवेलची साफसफाई करावी लागणार असून, हे अतिशय किचकट काम असल्याने किमान दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे २५ डिसेंबरपासून होणारी पाण्याची चाचणी रद्द केली आहे. आता फेब्रुवारीमध्येच शहरवासीयांना २०० एमएलडी पाणी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहराला दररोज आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी अमृत २ योजनेतून टाकण्यात येत असलेल्या २७४० कोटी रुपये खर्चाच्या पाणीप-रवठा योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नियुक्त केलेल्या कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने सिव्हील वर्क, पंप आणि मोटार बसविण्यासह यांत्रिक विभागाचे सर्व काम पूर्ण झाले आहे. मुख्य जलवाहिनीवरील केवळ गॅप जोडणीचेच काम शिल्लक होते. त्यातील ८ पैकी ५ ठिकाणच्या जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ५१ मीटर लांबीच ३ गॅपची जोडणी शिल्लक आहे. ही जोडणी अतिशय किचकट आणि वेळखाऊ असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रातील ११ ठिकाणी थस ब्लॉग्सचे काम शिल्लक आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान १५ जानेवारीपर्यंतचा अवधी लागणार आहे. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल आणि मुख्य जलवाहिनी यांच्या व्यापती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण काम अतिशय लक्षपूर्वक आणि बारकाईने करावे लागणार आहे. घाईघाईत काम पूर्ण केल्यास संपूर्ण योजनाच संकटात येण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
विद्युतीकरणाचे काम पूर्ण
जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले सर्व काम पूर्ण झाले आहे. आता महापालिकेकडून महावितरण कंपनीला नाहकत प्रमाणपत्र देण्याचेच काम शिल्लक आहे. त्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून महापालिकेला पत्रही देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.