

Shivna Takli Dam release
कन्नड, हतनूर : तालुक्यातील सर्वात मोठा शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात ९० टक्केच्या वर पाणी साठा झाला. त्यामुळे प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडून शिवना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून प्रकल्पाच्या वरील बाजूस पाऊस सुरु असल्याने प्रकल्पात ९०. ३६ टक्के इतका जलसाठा झाला. १५ ऑगस्ट रोजी रात्री प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडून शिवना नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.