छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील कारागृह पोलिसाचा खून

file photo
file photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहतील पोलिसाचा खून झाल्याची घटना समोर आली. जेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ बन्सीलाल जाधव (वय ४२, रा. जेल क्वार्टर) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

सिद्धार्थ जाधव हे त्यांचा मित्र सचिन दाभाडे (वय ३६, रा. चेतनानगर) यांच्या सोबत जेलच्या मागील भागात दारू प्यायला बसले होते. तेथे नेमके काय घडले, हे समजले नाही. दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. दोघांच्याही डोक्यात लाकडी दांड्याने मारण्यात आले. त्यात जाधव यांचा मृत्यू झाला तर दाभाडे जखमी झाले. हर्सूल ठाण्याच्या निरीक्षक सुनिता मिसाळ, उपनिरीक्षक निर्वळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी दोघांचेही बूट आढळून आले. त्यांच्यात वाद झाली की आणखी कोणी त्यांना मारहाण केली, हे समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news