Chhatrapati Sambhajinagar hurda market price-बाजारात हुरड्याची चाहूल, किलोला ४०० रुपयांचा भाव

छत्रपती संभाजीनगर- बाजारात हुरड्याची चाहूल, किलोला ४०० रुपयांचा भाव
Hurda party
Hurda party : थंडीची चाहूल : हुरडा पार्टीचा उत्साहFile Photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर- खवय्यांच्या विशेष पसंतीचा ज्वारीचा हुरडा बाजारात दाखल झाला असून, सध्या त्याला किलोमागे ४०० रुपये भाव मिळत आहे. हुरड्यासोबतच ओली आंबे हळद आणि जळगावच्या खास वांग्यांनीही बाजारात हजेरी लावली आहे. त्यामुळे औरंगपुऱ्यासह शहरातील भाजीबाजारात हिवाळी पदार्थांची चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, दुसरीकडे नियमित वापरातील भाजीपाल्यांचे दर ६० ते १०० रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

थंडीची चाहूल लागताच शहरातील भाजीबाजारात हिवाळी खाद्यपदार्थांची आवक सुरू झाली आहे. शेतातून थेट बाजारात येणाऱ्या ताज्या ज्वारीच्या हुरड्याला खवय्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. भाजून खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या हुरड्याची यंदाही बाजारात आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला मर्यादित आवक असल्याने किलोचा भाव ६०० ते ८०० रुपयांपर्यंत गेला होता. आता आवक वाढू लागल्याने दर ४०० रुपयांवर आले आहेत. दिवाळीनंतर बाजारात दाखल होणारी ओली आंबे हळदही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पालेभाज्यांचा दिलासा

एकीकडे फळभाज्या आणि मसाल्याच्या पदार्थांचे दर वाढले असताना पालेभाज्यांचे दर तुलनेने कमी आहेत. मेथी, कोथिंबीर, चुका आणि शेपू यांसह विविध पालेभाज्यांची जुडी अवघ्या १५ रुपयांना मिळत आहे. त्यामुळे महागाईच्या झळा सोसणाऱ्या ग्राहकांना पालेभाज्यांमुळे काहीसा दिलासा मिळत आहे.

पिवळ्या आणि पांढऱ्या प्रकारातील या हळदीचा वापर भाजी तसेच लोणचे तयार करण्यासाठी केला जातो. विशेषतः हिवाळ्यात आंबे हळदीच्या लोणच्याला पसंती मिळते. साधारण महिनाभर तिची आवक राहणार आहे. त्याचबरोबर जळगावच्या वांग्यांची आवकही सुरू झाली असून, किलोमागे ८० रुपये दर आहे. हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत ही वांगी बाजारात उपलब्ध असतात. हिवाळ्यात त्यांना विशेष मागणी असते.

Hurda party
Chhatrapati Sambhajinagar airport|औद्योगिक विकास सुसाट, पण हवाई कनेक्टिव्हिटी सुस्तच

वांगे, भेंडीसह कारल्याचे दर तेजीत

हिवाळी पदार्थांची आवक सुरू झाली असली, तरी रोजच्या भाजीपाल्याने मात्र ग्राहकांना घाम फोडला आहे. कांदा ६० ते ७०, टोमॅटो ४० ते ६०, काकडी आणि वांगे ६० ते ८०, भेंडी ८०, तर गाजर आणि कारले ८० ते १०० रुपये किलोने विकले जात आहे. लिंबाचे दर १६० ते २००, लसूण २५० ते ४०० आणि आले १५० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. बटाटे ३०, कोबी ४०, तर भोपळा ४० ते ५० रुपये किलोने विकला आहे.

Hurda party
Chhatrapati Sambhajinagar | दिव्यांग भवनाच्या विस्तारासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा २० कोटींचा प्रस्ताव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.