छत्रपती संभाजीनगर : १० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक 'लाचलुचपत' च्या जाळ्यात

१० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक 'लाचलुचपत' च्या जाळ्यात
Bribery case
छत्रपती संभाजीनगर : लाच घेताना ग्रामसेवक 'लाचलुचपत' च्या जाळ्यात Pudhari File Photo

वैजापूर : पुढारी वृत्‍तसेवा

गायगोठा बांधल्यानंतर झालेल्या खर्चाची बिलाच्या मोजमाप पुस्तिकेवर (एमबी ) सहया केल्याचा मोबदला म्हणून १० हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अर्जुन गंगाधर खरबडे (वय ४४) पद ग्रामसेवक (वर्ग-३) राहेगाव ता. वैजापूर असे या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.

Bribery case
Ladakh | लडाखमध्ये मोठी दुर्घटना! ५ सुरक्षा जवानांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील तक्रारदार यांची पत्नी या तालुक्यातील राहेगाव येथील ग्राम पंचायत सदस्य आहेत. दरम्यान त्यांचे पती (तक्रारदार) व याच गावातील इतर ६ लाभार्थ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२२-२४ या आर्थिक वर्षात मंजूर गायगोठा बांधला. दरम्यान झालेल्या खर्चाची बिलाच्या मोजमाप पुस्तिका (एमबी) वर सह्या केल्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक अर्जुन खरबडे याने प्रथम प्रत्येकी ५ हजार एमबी प्रमाणे व त्यानंतर तडजोडी अंती प्रत्येकी ३ हजार रुपये प्रमाणे एकूण २१ हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली. तडजोडी अंती १० हजार रुपयात तो मान्य झाला. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने घटनेतील तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला.

Bribery case
लडाखला गेलेला गोव्याचा कृष्णा हिमालयातच विसावला

दरम्यान २८ जून रोजी येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात पथकाने सापळा रचला. यावेळी ग्रामसेवक अर्जुन खरबडे याला १० हजार रूपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई लाप्रवि पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, उपधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हरिदास डोळे, पोलीस हवालदार साईनाथ तोडकर, पोलीस हवालदार, राजेंद्र जोशी चालक पो अमलदार दैठणकर यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news