Chhatrapati Sambhajinagar Crime | सीसीटीव्हीच्या धाग्याने सराफी चोरीचा उलगडा; दीड तोळ्याची अंगठी चोरणारा नेवाशात जेरबंद

महेंद्र ज्वेलर्समधील भरदिवसा चोरी; दहिवाळकर सराफ यांच्या सतर्कतेने आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात
Gangapur  Gold Ring Theft Case
महेंद्र ज्वेलर्समधील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ग्राहकाच्या वेशात आलेला संशयित सोन्याची अंगठी घेऊन दुकानातून बाहेर पडताना Pudhari
Published on
Updated on

Gangapur Gold Ring Theft Case

गंगापूर : शहरातील गजबजलेल्या राजीव गांधी चौक परिसरातील महेंद्र ज्वेलर्स येथे ग्राहक असल्याचा बनाव करून भरदिवसा सुमारे दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या चोरट्याला नेवासा पोलिसांनी काही तासांतच मुद्देमालासह जेरबंद केले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज, सराफा व्यावसायिकांची सतर्कता आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे या धाडसी चोरीचा वेगाने उलगडा झाला.

सोमवारी (दि. २७ जुलै) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एक तरुण ग्राहक असल्याचा आव आणत महेंद्र ज्वेलर्समध्ये दाखल झाला. त्याने दुकानदार देवेंद्र सुवर्णकार यांच्याकडे सोन्याची अंगठी पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार सुमारे दीड तोळ्याची सोन्याची अंगठी त्याला दाखविण्यात आली. अंगठी हातात घेतल्यानंतर त्याने ती बोटात घालून पाहिली आणि काही क्षणातच दुकानाबाहेर धूम ठोकली.

Gangapur  Gold Ring Theft Case
Chhatrapati Sambhajinagar Crime : १८ दिवस डिजिटल अरेस्ट; वृद्धेला १२ लाखांचा गंडा

घटना लक्षात येताच दुकानातील कारागिराने आरोपीचा पाठलाग केला. आरोपी जुने बसस्थानक परिसरातून धावत पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात पोहोचला. तेथे आधीपासूनच मोटारसायकलवर साथीदार तयार असल्याने त्याच्या मदतीने आरोपीने भरधाव पलायन केले. त्यामुळे पाठलाग करूनही तो हाती लागला नाही.

घटनेनंतर सराफा व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. गंगापूर पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. तसेच संशयिताचे छायाचित्र व माहिती परिसरातील सराफा व्यावसायिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

Gangapur  Gold Ring Theft Case
Chhatrapati Sambhajinagar crime : चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेटवले

दरम्यान, आरोपीची ओळख आसीम सादीक शेख (वय २८, रा. प्रवरासंगम, ता. नेवासा) अशी झाली. चोरी केलेली अंगठी विकण्याच्या उद्देशाने तो नेवासा फाटा येथील दहिवाळकर सराफ या दुकानात गेला. गंगापूर येथील चोरीच्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि दुकानात आलेला संशयित हा एकच असल्याचे व्यावसायिक विजय पोपटराव दहिवाळकर यांच्या लक्षात आले. त्यांनी कोणताही विलंब न करता नेवासा पोलिसांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता गंगापूर येथील चोरीतील सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीचा काही तासांतच उलगडा झाल्याने पोलिसांच्या तत्पर कारवाईचे तसेच सराफा व्यावसायिकांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. ग्राहकांच्या वेशात येणाऱ्या संशयित व्यक्तींविषयी अधिक दक्षता बाळगण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Gangapur  Gold Ring Theft Case
Chhatrapati Sambhajinagar crime : सहा कोटींचा अपहार : लोक आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्षासह तिघे गजाआड

दहिवाळकर यांच्या प्रसंगावधानामुळे चोरीचा उलगडा

गंगापूर येथील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यामुळे विजय पोपटराव दहिवाळकर यांनी संशयिताला ओळखले. त्यांनी तातडीने नेवासा पोलिसांना माहिती दिल्याने आरोपीला चोरीचा मुद्देमालासह ताब्यात घेणे शक्य झाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news